drunk couple in nagpur viral video shows public intoxication  
Trending News

उडता नागपूर? नशेत असणाऱ्या तरुणीला सांभाळण्यासाठी तरुण गेला पण... पुढे काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावरुन रोज काही ना काही तरी विचित्र गोष्टी घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी जोडप्यांचे भररस्त्यात वाहनांवर अश्लील चाळे सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यापूर्वीही असं अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशातच नागपूरमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

एका सिग्नलवर नशेत असणाऱ्या तरूणीला एका तरूणाने आधार दिला आहे. पण, पुढे त्यालाच आधाराची गरज भासली. काय घडलं नक्की जाणून घेऊयात.

व्हिडीओमध्ये नक्की काय दिसतं?

व्हायरल होणारा व्हिडीओ नागपुरातील बजाज नगर पोलीस स्टेशनला हद्दीतील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी नशेत असल्याचा कयास लावण्यात आला आहे. यावेळी या नशेत असणाऱ्या तुरुणीला सावरण्यासाठी तरुण पुढे येतो अन् तरुणीला सावरण्याचा प्रयत्न करतो. तरुणीला चालता येत नसल्याने तो तरूण तिला उचलत नेतो पण काही अंतर चालल्यानंतर पाय अडकून दोघेही खाली पडतात.

हा व्हिडिओ नेमकं केव्हाचा आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही, तरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात भररस्त्यात वाहनांवर अश्लील चाळे

गेल्या आठवड्याभरात प्रेमी युगलांचे अश्लील चाळे करणारे कार आणि दुचाकीवरील व्हिडिओ समोर आले होते. या सर्व घटना नागपूरमधील असल्यामुळं नेमकं तिथं सुरु आहे तरी काय? असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT