पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पांढऱ्या केसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते वयाने मोठे दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. काळ्या आणि स्टायलिश केसांसाठी प्रसिद्ध असलेले इम्रान खान या व्हिडीओमध्ये ते ओळखायला देखील येत नाहीत. अनेकांनी तर हे इम्रान खान आहे का, असा प्रश्नही केला आहे.
बुधवारी इनकॉग्निटो नावाच्या सोशल मिडीया एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो 1600 हून अधिक लोकांनी शेअर केला आहे. तर अल्पावधीतच 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मेकअप आणि हेअर डाईशिवाय."
न्यूज इंटरनॅशनल वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने फोटो लीक होण्यावर आक्षेप घेतला आहे, त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 'सकाळ' या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.
व्हिडिओतील व्यक्ती खरोखरच पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे नेते आहेत का, असा प्रश्न एका सोशल मिडीया युजरने विचारला आहे. आणखी एका युजरने लिहिले की, 71 वर्षीय व्यक्ती कॅल्विन क्लेन मॉडेलसारखी दिसेल अशी तुमची अपेक्षा आहे का?
आणखी एका युजरने ही क्लिप फेक आणि एआयच्या मार्फत बनवली असल्याचे म्हटले आहे. एआयने तयार केलेल्या व्हिडिओंद्वारे लोकांना मूर्ख बनविणे थांबवा, असे त्यांनी सोशल मिडीया युजरने म्हटलं आहे.
भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील बदलांशी संबंधित प्रकरणात इम्रान खान गुरुवारी व्हिडिओ लिंकद्वारे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात हजर झाले होते. पण व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक काळ्या केसांनी कोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाल्याची लीक झालेली क्लिप दिसत आहे.
मागील सरकारने राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो (एनएबी) कायद्यात केलेले बदल रद्द करण्याच्या विरोधात सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी मंगळवारी खान यांना आपली बाजू मांडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्यानंतर खान यांची ऑनलाइनद्वारे उपस्थिती दर्शवली होती.
इम्रान खान यांनी एनएबी कायद्यातील बदलांना आव्हान दिले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची याचिका स्वीकारली होती, ज्यात खान यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पीएमएल-एनचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांच्यासह काही प्रमुख नेत्यांवरील कथित भ्रष्टाचाराची १२ पेक्षा जास्त प्रकरणे पुन्हा उघडली गेली होती.
खान व्हिडिओ लिंकद्वारे या प्रकरणात याचिकाकर्ते म्हणून हजर झाले होते, परंतु सुनावणीच्या विद्यमान परंपरेनुसार त्यांचे थेट प्रक्षेपण केले गेले नाही. या खटल्याच्या मागील कामकाजाचे ही सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रक्षेपण केले होते, परंतु गुरुवारी तसे झाले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.