Viral video_Hingoli 
Trending News

भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्याच्या पोरानं इंग्रजीतून झाडलं! व्हिडिओ व्हायरल

जमीन मोजणीच्या कामासाठी नाडणाऱ्या कर्मचाऱ्याला कार्यालयात जाऊन त्यानं आपल्या पद्धतीनं जाब विचारला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जमीन मोजणीसाठी पैसे भरल्यानंतरही काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्याच्या पोरानं इंग्रजीतून झाडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांना पदोपदी नाडणाऱ्या अशा निर्धावलेल्या सरकारी बाबूंचा कारभार त्यामुळं चव्हाट्यावर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ असून याची अद्याप पुष्टी झालेली नाही. (farmer son fired employee of land records from English video viral)

काय घडलंय नक्की?

हिंगोली जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून यामध्ये शेतकऱ्याचा एक उच्चशिक्षित मुलगा आपल्या गावच्या जमीनीसंदर्भातील कामासाठी भूमी अभिलेखच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला इंग्रजीतून झापताना दिसतोय. आपल्या वडिलांनी जमिनीच्या मोजणीसाठी पैसे भरुनही त्यांना अद्याप मोजणीची नोटीस मिळाली नव्हती. पैसे भरुनही ही नोटीस पाहू दिली जात नव्हती. त्यामुळं संतापलेल्या या शेतकऱ्याच्या मुलानं संबंधित कर्मचाऱ्याचा इंग्रजी भाषेत चांगलाच समाचार घेतला.

व्हायरल व्हिडिओत काय आहे?

लाचखोर कर्मचाऱ्याला उघडं पाडण्यासाठी त्यानं मोबाईलमध्ये याचं चित्रीकरणंही केलं. संतापलेल्या या शेतकरी पुत्रानं कर्मचाऱ्याला इंग्रजीत झापायला सुरुवात केल्यानंतर त्याची भंबेरी उडाली होती.

शेतकरी पुत्र : "मला अद्याप माझी नोटीस मिळालेली नाही, मला ती तातडीनं हवी आहे. तुमचं ओळखपत्र कुठे आहे? मला बाकी काही नको"

कर्मचारी : यासाठी तुम्हाला साहेबांना भेटावं लागेल.

शेतकरी पुत्र : हवं तर माझ्याविरोधात तुम्ही खटला दाखल करा, मी तुमच्याशी इथं तुमच्याशी हुज्जत घालायला आलेलो नाही.

कर्मचारी : तुम्हाला नोटीस पाठवली आहे.

शेतकरी पुत्र : मला आत्ताच्या आता नोटीस हवी आहे, ती तुम्ही कशी पाठवली आहे, त्याची प्रक्रिया मला मला सांगा. तुम्ही नोटीस पाठवायला उशीर का केला? तुम्ही मला तातडीनं याबाबत का कळवलं नाही? माझे वडील इथं दिसताहेत का? तुम्ही चुकीची गोष्ट केली आहे. याच्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे? मला आत्ताच्या आत्ता नोटीस हवी आहे, पोलिसांनाही बोलवा.

कर्मचारी : तुम्हाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

शेतकरी पुत्र : नाही, मला तुमच्या विभागाकडून अद्याप कुठलीही नोटीस आलेली नाही.

कर्मचारी : पोस्टानं तुम्हाला नोटीस पाठवण्यात आली आहे.

शेतकरी पुत्र : पोस्टानं नोटीस पाठवल्याचं रेकॉर्ड मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. तुम्ही चुकीचं काम केलं आहे. तुमच्या विभागानं अद्याप नोटीस का पाठवली नाही, याचं उत्तर मला हवं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: मविआकडून बीकेसीच्या सभेत पंचसुत्री जाहीर

SCROLL FOR NEXT