VIral VIdeo Sakal
Trending News

'पापा की परी' उगाच नाही म्हणत! बाप लेकीचं नातंच असतं अनोखं; बघा Viral Video

"पप्पा I Love You, लवकर या"; बापाचा Video Call आला अन् लेकीचा आनंद गगनात मावेना

सकाळ डिजिटल टीम

बाप लेकीचं नातं अनोखं असतं. आपली लेक ही बापासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. दोघांचाही एकमेकांवर अफाट जीव असतो. त्याला वयाची बंधने नसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अवघ्या एका वर्षाची चिमुकली आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील चिमुकली अवघी आठ महिने ते एका वर्षाची असून तिच्या वडिलांचा व्हिडिओ कॉल आल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही. "पप्पा लवकर या, आय लव्ह यू पप्पा" असं म्हणत ती फोनला मिठी मारताना आणि फोनवरील पप्पांच्या फोटोची पप्पी घेताना दिसत आहे.

दरम्यान, हा बापलेकीचं हे नातं पाहून तुम्हालाही आपल्या लेकीची किंवा वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ही चिमुकली जरी वडिलांना प्रत्यक्षरित्या भेटू शकत नसली तरी तंत्रज्ञानाने तिची आणि वडिलांची भेट घडवली यामुळे तंत्रज्ञानाचे आभार असं कॅप्शन या व्हिडिओवर टाकण्यात आलं आहे.

इंस्टाग्रामवरील Babyviha30 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला ३ लाख ३३ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं असून यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बापलेकींचा हा गोड व्हिडिओ पाहून आपल्यालाही समाधान वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT