Former BJP MLA Suresh Rathore Urmila Sanawar Viral Video Esakal
Trending News

Viral Video: "पतिदेव जर तुम्ही..." भाजपचा माजी आमदार पती असल्याचा दावा, अभिनेत्रीने थेट व्हिडिओच व्हायरल केला

आशुतोष मसगौंडे

अभनेत्री उर्मिला सनोवर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करत भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड आपले पती असल्याचा दावा केला होता. आता या अभिनेत्रीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये माजी आमदार राठोड, "ओ मेरी मेहबूबा.." हे गाणं गात असल्याचे दिसत आहेत.

यावेळी हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने, "पतीदेव जर तुम्ही माझे प्रियकर आहात, तर मी पण प्रेम करण्यात कोणती कसर सोडणार नाही. आणि तुम्हालाही सोडून कुठे जाणार नाही," असे कॅप्शन लिहिले आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान लाईव्हा या हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.

दरम्यान आता भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांनी अभिनेत्री उर्मिला सनोवर यांच्यावर उत्तराखंडमधील ज्वालापूर येथे गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर ब्लॅकमेलिंग आणि राजकीय व सामाजिक प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत माजी आमदाराने अभिनेत्रीवर ब्लॅकमेल करत २५ लाखांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वी या अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी आमदाराबाबत अनेक व्हिडिओ अपलोड करून राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

माजी आमदार सुरेश राठोड हे आपले पती असल्याचा दावा अभिनेत्री उर्मिला सनोवर यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये माजी आमदार सुरेश राठोर हे अभिनेत्रीचे केस विंचरताना दिसत होते.

दरम्यान अभिनेत्री सतत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत असल्याने माजी आमदार सुरेश राठोड यांनी अभिनेत्रीवर कारवाई केली आहे.

माजी आमदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राठोड यांनी ज्वालापूर येथे फिर्याद दिली आहे.

कोण आहेत सुरेश राठोड?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स उर्मिला सनवार आणि सुरेश राठोर यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरेश राठौर हे भाजप नेते आणि ज्वालापूरचे (उत्तराखंड) माजी आमदार आहेत.

सुरेश राठोड हे तीन वेळा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दोन वेळा अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री) राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs New Zealand: भारतीय फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांचा कस लागणार, न्यूझीलंडच्या खेळाडूनंच दिला सावधानतेचा इशारा

Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम

Chandrasekhar Bawankule: मंत्रिमंडळात चर्चा न करताच संस्थेला भूखंड दिल्याने वाद; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली प्रतिक्रिया

Latest Maharashtra News Updates : मुंबई-पुण्यात जोरदार पावसाची हजेरी! नागरिकांची तारांबळ

Ishan Kishan घेणार ऋषभ पंतची जागा, IND vs BAN मालिकेसाठी टीम इंडियात होणार पुनरागमन?

SCROLL FOR NEXT