Gadchiroli esakal
Trending News

Gadchiroli Video Viral : रस्त्याअभावी गरोदर मातेचे हाल; जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून पूल पार करण्याची नामुष्की

संतोष कानडे

गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रस्ता नसल्याने गरोदर मातेला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून पूल पार करावा लागला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्मातील दक्षिण भागात अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. आलापल्ली ते भामरागड या १३०-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.

मात्र, रहदारीसाठी पर्यायी पक्का रस्ता नाही. मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका गरोदर मातेला बसला आहे.

भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने ती रुग्णालयासाठी निघाली. मात्र रस्ता वाहून गेला असल्याने तिला समोर जाता आले नाही. तेव्हा रस्ता कामावर उभे असलेल्या जेसीबीच्या बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट आहे, याची प्रचिती येतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT