Education News India : गेमिंगचा नाद प्रत्येकाला असतो. कधी न कधी रिकाम्या वेळेत आपण गेम खेळतोच पण गेम खेळल्यामुळे कधी कुणाची नोकरी गेलीये अस ऐकलं आहे काय? अशी एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील शासकीय शाळेत. इथल्या गुरुजींना मोबाईलवर candy crush खेळण चांगलंच महागात पडल आहे.
उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील शासकीय शाळेत एका सहाय्यक शिक्षकाला कामकाजच्या वेळेत फोनवर कँडी क्रश गेम खेळणे आणि सोशल मीडिया वापरण्याची शिक्षा म्हणून निलंबित करण्यात आलं आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र पांडे यांनी शाळेवर अचानक तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या वह्यांची तपासणी केली असता पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत भरपूर चुका आढळून आल्या. यानंतर त्यांनी त्या सहाय्यक शिक्षकाच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावर एक अॅप्स वापरण्याचा वेळ दर्शवणारी खास सुविधा होती. यातून त्यांना समजले की, हा शिक्षक दररोज शाळेच्या वेळेत तब्बेत दोन तास कँडी क्रश गेम खेळत असतो.
जिल्हाधिकारी राजेंद्र पांडे यांनी सांगितलं, "शिक्षकांनी विद्यार्थ्यांची होमवर्क तपासण्यावर आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करावं. मोबाईल वापरण्यात काहीच वावगे नाही. पण शाळेच्या वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाईल वापरणं योग्य नाही."
जिल्हाधिकारींनी सहा विद्यार्थ्यांच्या वह्यांच्या पहिल्या सहा पानांची तपासणी केली असता त्यांना 95 चुका आढळून आल्या. पहिल्या पानावरच तर 9 चुका होत्या. यावरून त्यांनी असंतोष व्यक्त केला आणि सहाय्यक शिक्षक प्रियाम गोयल यांचा फोन तपासला. त्यांच्या फोनमध्ये असलेल्या 'डिजिटल वेलबीइंग' या फीचरवरून असे आढळून आले की, गोयल हे दररोज शाळेच्या वेळेत सरासरी दीड तास कँडी क्रश गेम खेळत असत.
दहापैकी साडेपाच तास असलेल्या शाळा वेळेत, प्रियाम गोयल यांनी जवळपास दोन तास कँडी क्रश खेळला, 26 मिनिट्स फोनवर गप्पा मारल्या आणि सुमारे 30 मिनिट्स सोशल मीडिया ॲप्स वापरल्या.
या सर्व प्रकाराची माहिती जिल्हाधिकारींनी राज्य शिक्षण विभागाला कळविली. विभागाने याची दखल घेऊन त्या सहाय्यक शिक्षकाला निलंबित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.