Students staging a protest outside the girls' hostel in Gudivada after hidden cameras were found in washrooms. esakal
Trending News

बापरे धक्कादायक! मुलींच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये लावले छुपे कॅमेरे, शेकडो व्हिडिओंची केली विक्री

Students Protest After Discovery of Hidden Cameras and Video Sale: रात्रभर अभियांत्रिकी महाविद्यालयात तणावपूर्ण परिस्थिती होती. सुमारे 3:30 वाजेपर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलीस या घटनेची अधिक तपासणी करत असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Sandip Kapde

विजयवाडा : आंध्र प्रदेशमधील गुडिवाडा येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये छुपे कॅमेरे आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींनी मध्यरात्री वसतिगृहाच्या प्रांगणात एकत्र येत तीव्र आंदोलन केले. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयाच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये गुपचूप कॅमेरे लावल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या कॅमेरांच्या साहाय्याने शेकडो व्हिडिओ शूट करण्यात आले होते, जे एका अंतिम वर्षातील बी.टेक. विद्यार्थ्याने विकल्याचा आरोप आहे. या घटनेने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

पोलीस हस्तक्षेप व चौकशी

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले असून, संशयित विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

व्हिडिओंची केली विक्री-

आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. हातात मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी आपली मागणी जोरदारपणे मांडली. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय नावाच्या एका अंतिम वर्षाच्या बी.टेक. विद्यार्थ्याने या छुप्या कॅमेरांमधून शूट करण्यात आलेल्या व्हिडिओंची विक्री केली होती. या आरोपामुळे विद्यार्थ्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करताना या सर्वांची चौकशी केली.

रात्रभर तणावपूर्ण परिस्थिती

रात्रभर अभियांत्रिकी महाविद्यालयात तणावपूर्ण परिस्थिती होती. सुमारे 3:30 वाजेपर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलीस या घटनेची अधिक तपासणी करत असून, संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT