How are scenes on bikes, cycles shot in Hindi Movies And Series:
भारतीय चित्रपट आणि बाईक व सायकलेचे नाते खूप जुने आहे. आपण शोलेपासून ते धूमपर्यंत अशा अनेक चित्रपटांमध्ये बाईक व सायकलवर चित्रित केलेले स्टन्ट्स आणि दृश्ये पाहत आलो आहोत. अशात अनेकवेळा हे सर्व पाहत असताना अनेकांना नक्कीच हा प्रश्न पडतो की, हे स्टन्ट्स आणि दृश्ये खरोखरे कलाकार करत असतात की दुसरे कोणी?
दरम्यान आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. इन्स्टाग्रामवर एका युजरने बाईक, सायकलवरील सीन कसे शूट होतात याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
गणेश मोडक यांनी इन्स्टाग्रामवर एका मराठी मालिकेतील बुलेटवरील सीन कसे शूट केले जात आहेत याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ट्रॅकला बांधलेल्या बुलेटवर नायक ड्रायव्हिंग सीटवर आहे. तर मागे नायिका नायकाच्या खांद्यावर हात टाकून बसली आहे.
दरम्यान यामध्ये पावसातील सीन चित्रित करत असल्याचे दिसत असून, कोल्हापूर पासिंगची बुलेट असल्यामुळे हे सीन मराठी मालिका किंवा चित्रपटातील असण्याची शक्यता आहे.
डिजिटल क्रिएटर असलेल्या गणेश मोडक यांनी हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये याकलवरचे सीन शूट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, एका ट्रॅकवर बांधलेल्या सायकलवर अभिनेता आणि अभिनेत्री बसलेले असून शेजारी बांधलेल्या कॅमेऱ्यातून सीन चित्रित केला जात आहे.
कॉमेडी असो, ॲक्शन असो वा ड्रामा, चाहत्यांना विशेषतः कार आणि मोटरसायकलभोवती फिरणारे चित्रपट आवडतात हे अनेकवेळा आपण पाहिले आहे.
चित्रपट हा कथाकथनाचा एक उत्कृष्ट प्रकार आहे आणि जेव्हा भारतीय चित्रपटांचा, विशेषत: बॉलीवूड चित्रपटांचा विचार केला जातो, तेव्हा गेल्या काही वर्षांत आपण काही उत्कृष्ट कथा बाईक स्टन्ट्समुळे मोठ्या पडद्यावर जिवंत झाल्याचे पाहिले आहे. त्यामुळे सायकल आणि बाईकवरील सीनबाबत चाहत्यांना कायमच उत्सुकता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.