Viral Video 
Trending News

Viral Video : बापरे! कॅनडामध्ये वेटरच्या नोकरीसाठी हजारो 'भारतीय' रांगेत; रेस्टॉरंटबाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Indian students queue up for waiter jobs in Canada : व्हिडीओ कॅनडा येथील ब्रॅम्पटन (Brampto) मध्ये तंदूरी फ्लेम रेस्टॉरंटचा असल्याचे सांगितले जात आहे.

रोहित कणसे

कॅनडामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका न्यूज रिपोर्टचा असून यामध्ये एका रेस्टॉरंटबाहेर तरुणांची लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. हे सर्व लोक रेस्टॉरंटमध्ये वेटर आणि सर्व्ह करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचे सांगितले जात आहे. दावा केला जात आहे की यामध्ये जास्तकरून भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

व्हिडीओ कॅनडा येथील ब्रॅम्पटन (Brampto) मध्ये तंदूरी फ्लेम रेस्टॉरंटचा असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक माध्यम संस्था ओमनी टेलिव्हीजनने काही दिवसांपूर्वीच्या घटनेबद्दल रिपोर्ट देताना आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की रेस्टॉरंटने आपल्या नव्या व्हेंचरसाठी वेटर आणि सर्वर पदांसाठी भरती सुरू केली होती. यासाठी जाहीरात देखील करण्यात आली होती.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी कॅनडामध्ये वाढती बेरोजगारी आणि मंदीच्या संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT