instagram viral reels Girlfriend on Rent girl offered to go on a date for money  
Trending News

Trending: 'गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल' आधी रिल्सवर केली जाहीरात अन् आता म्हणते...

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'रेंटवर मिळणार गर्लफ्रेंडची'. अनेकांना प्रश्न पडला असेल रेंटवर गर्लफ्रेंड? हा काय विषय. तर हो. बहुतांश लोकांनी रेंटवर गर्लफ्रेंड मिळणार या रीलला फॉलोदेखील केलं आहे. पण ही रील करण्यामागचं नेमकं कारण काय? ही रील कोणी बनवली? या मागचा नेमका उद्देश काय? या सर्वाच खुलासा रील बनवणाऱ्या तरुणीनं स्वतःच केला आहे.

दिव्या गिरी अस या तरुणीचं नाव असून गुरुग्राम येथील रहिवासी आहे. २५ वर्षीय ही तरुणी कंटेंट रायटर आहे. तिनं काही दिवसांपूर्वी, तिच्या इंस्टाग्रामवर 'रेंटवर मिळणार गर्लफ्रेंडची' रील बनवली. यामध्ये तिनं अनेक डेटचे रेंटदेखील शेअर केले आहे.

तसेच, 'मली डेटवर घेऊन जा आणि आनंदाचे क्षण अनुभवा', अशी कॅप्शनदेखील या तरुणीने दिली. तिची ही रील 90 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. पण नेटकऱ्यांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्सनंतर तरुणीने रील करण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. तसेच ही रीलदेखील डिलीट केली आहे.

काय म्हणाली तरुणी?

इंडिया टुडेशी बोलताना दिव्या म्हणाली, मी जपानमध्ये असं काहीस घडताना पाहिलं आहे. ते पाहिल्यानंतर मी ही रील पोस्ट केली. माझ्याकडे जपानची कोणतीही वेबसाईट नाही. म्हणून मी माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.

जपानमध्ये बॉयफ्रेंड रेंटवर घेण्याचा ट्रेंड आहे. मला ते खुप आवडले. विशेषतः व्हॅलेंटाईन डेच्या वेळी. म्हणूनच मला भारतातही असेच काहीतरी हवे होते. सगळ्यात आधी मला बघायचे होते की लोक यावर काय प्रतिक्रिया देतील. आणि दुसरे म्हणजे, मी ही गमंत म्हणून पोस्ट केली. पण मी डेटवर जाण्यास तयार होते.

मी रीलमध्ये डेटिंगचे रेंट दिले आहेत. पण पैसा हे कारण कधीच नव्हते. माझी नोकरी आहे आणि माझे कुटुंबही मला सपोर्ट करते. डेटिंगचे रेंट देण्याचे कारण इतकेच होते की, मी अनोळखी व्यक्तींशी माझा संबंध येऊ नये. असं स्पष्टीकरण रील बनवणाऱ्या तरुणीनं दिलं आहे.

तरुणीचे डेटींग रेट

चिल कॉफी डेट: 1500 रुपये

नॉर्मल डेट (डिनर और मूवी): 2000 रुपये

कुटुंबासोबत भेटण्यासाठी : 3000 रुपये

इवेंट कम्पेनियन: 3500 रुपये

बाइक डेट (हातात हात घेऊन) : 4000 रुपये

डेट सार्वजनिक करायची असेल तर: 6000 रुपये

शॉपिंग स्प्री: 4500 रुपये

वीकेंडला फिरायला जायचे झाले तर.. (2 दिवस): 10,000 रुपये

जपानमध्ये बॉयफ्रेंडच्या रेंटचा विषय नेमका आहे तरी काय?

जपानमध्ये "रेंटवर बॉयफ्रेंड" हा विषय काही नवीन नाही. तिथे तुम्ही फक्त बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडच भाड्याने देऊ शकत नाही तर वडील किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यालाही भाड्याने देऊ शकता.

2023 मध्ये जपान न्यूजने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की तेथील सुमारे 40 टक्के लोक एकटे आहेत. एवढेच नाही तर याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये वाढत्या आत्महत्येचे प्रमाण पाहता जपान सरकारने तेत्सुशी साकामोटो यांची जपानची पहिली 'एकटेपणा मंत्री' म्हणून नियुक्ती केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT