Video Viral Sakal
Trending News

Video : बुक केलेला iPhone 15 देण्यास उशीर! संतप्त ग्राहकाची दुकानदाराला बेदम मारहाण

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : काल देशभरात अॅप्पल या कंपनीने आयफोन १५ सिरीज लाँच करत विक्री सुरू केली. हा फोन घेण्यासाठी देशभरातील अॅप्पलच्या स्टोअर बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. तर दिल्लीत एक विचित्र घटना घडली असून आयफोन बुक केल्यानंतरही वेळेत न मिळाल्याने एका ग्राहकाने दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, दिल्लीतील कमला सदर परिसरातील एका अॅप्पल स्टोअरवर ग्राहकाने आयफोन १५ बुक केला होता. पण तो वेळेत न मिळाल्याने दुकानदार आणि ग्राहकांत सुरूवातील बाचाबाची झाली. त्यानंतर ग्राहकाने मोबाईल शॉपी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून याप्रकरणी मोबाईल शॉपी कर्मचाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सदर ग्राहकावर कायदेशीर कारवाई केली असून पोलिसांकडून सदर व्हिडिओची पुष्टी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT