Overfeeding Pet Dog sakal
Trending News

Overfeeding Pet Dog : पाळीव प्राण्यांना अतिखाऊ घालताय? सावधान!कुत्र्याच्या मालकीणीला झालाय तुरूंगवास...काय घडलं नेमकं ?

Animal Lovers Dogs News : आता रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना आणि तुमच्या पाळीव कुत्र्याला विचार करूनच खायला द्या.

सकाळ डिजिटल टीम

आता रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना आणि तुमच्या पाळीव कुत्र्याला विचार करूनच खायला द्या. पोट भरले आहे की नाही हे न समजता लोक अनेकदा विचार न करता त्यांना खायला घालतात. असेच काहीसे एका महिलेने केले. ती दररोज तिच्या पाळीव कुत्र्याला आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खायला घालायची. असे केल्याने एके दिवशी कुत्र्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महिलेला यासाठी तुरुंगात जावे लागले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण न्यूझीलंडचे आहे. येथे एका महिलेला 2 महिने तुरुंगवास भोगावा लागला. या महिलेवर आरोप आहे की, तिने आपल्या पाळीव कुत्र्याला जास्त अन्न खायला दिले, त्यामुळे तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. रॉयल न्यूझीलंड सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स (SPCA) नुसार, प्राणी नियंत्रण अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये या महिलेच्या निवासस्थानाची झडती घेतली तेव्हा त्यांना नुगी नावाचा हा कुत्रा तिथे दिसला.

अशी झाली होती कुत्र्याची अवस्था

जास्त खाल्ल्याने कुत्र्याचे वजन ५३.७ किलो झाले होते. त्याच्या शरीरावर चरबीचा एवढा जाड थर होता की कुत्र्याच्या हृदयाचे ठोके ऐकणेही कठीण झाले होते. त्यावेळी कुत्र्याला कंजंक्टिवायटिस होते आणि त्याची नखे जास्त वाढलेली होती. कुत्र्याची अवस्था इतकी वाईट होती की 10 मीटर चालण्यासाठी त्याला तीन वेळा थांबावे लागले.

या महिलेची चौकशी केली असता तिने कबुली दिली की, बिस्किटे आणि कुत्र्याचे जेवण याशिवाय ती दररोज 8 ते 10 चिकनचे पीस तिच्या पाळीव कुत्र्याला खाऊ घालत असे. टॉड यांनी सांगितले की, जे लोक कोणताही प्राणी पाळतात त्यांनी त्यांचे 'पेट' किती अन्न खाईल याचीही काळजी घेतली पाहिजे आणि जर त्यांनी जास्त खाल्ले तर ते गंभीर आजारी पडू शकतात.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT