Jodi Anoorabh Net Worth: सोशल मीडियामुळे अनेक सेलिब्रिटी उदयास आले आहेत. आपल्या कौशल्याने त्यांनी लाखो लोकांना भुरळ घातली आहे. सध्या सोशल मीडियावर अशीच एक जोडी त्यांच्या डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत आहे. बेंगळुरुमध्ये राहणाऱ्या जोडप्याने अगदी काही महिन्यांत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या जोडीचे नाव आहे अनुषा शेट्टी आणि सौरभ चंदेरिया.
या दोघांच्या भेटीमागे एक मजेदार किस्सा आहे. 2015 मध्ये, दोघेही एका डेटिंग ॲपवर भेटले. आणि त्यांची 'प्रेमाची गोष्ट' सुरु झाली. त्यांना एकमेकांविषयी त्यांच्या प्रवासा विषयी सुरुवातीला जास्त माहिती नव्हती. अनुशा आणि सौरभ हे दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारे. अनुशा उडुपीची आणि सौरभ मुंबईचा आहे. सध्या दोघेही बेंगळुरुमध्ये स्थायिक झाले आहेत.
दोघेही मोठ्या IT कंपन्यांमध्ये काम करत होते आणि त्यांना एकत्र आणणारा दुवा ठरला डान्स. याआधी, सौरभ त्याच्या यूट्यूब चॅनेलवर जवळपास सात वर्षांपासून पोस्ट करत होता.
स्टेजवरील भीतीवर मात करण्यासाठी त्याने आयआयटी बॉम्बेमध्ये असताना कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स केला होता. त्यातून त्याची भीती कमी झाली. दुसरीकडे, अनुशा ही एक उत्साही डान्सर होती. तीला जिथे संधी मिळेल तिथे ती डान्स करत असत.
जेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले तेव्हा तिने काही वर्ष डान्स केला नव्हता. पण एकमेकांना भेटल्यावर त्यांनी स्वत:चे डान्स कौशल्य ओळखून सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
अनुषा शेट्टी आणि सौरभ चंदेरिया यांनी त्यांच्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या. कारण त्यांना 9 ते 5 काम करायचे नव्हते असे त्यांनी ठरवले होते. दोघांनीही पूर्ण वेळ कंटेंट क्रिएटर्स बनण्याचे ठरवले.
दोघांनी गेल्या काही वर्षात इंस्टाग्रामवर 4,000 फॉलोअर्सवरून जवळपास 2,25,000 फॉलोअर्सचा टप्पा पार केला. त्यांच्या व्हिडिओमध्ये उत्स्फूर्तता असते. त्यामुळे लोकांना त्यांचे व्हिडिओ आवडतात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांचा व्हिडिओ शेअर केला होता.
त्यांनी चार वर्षांपूर्वी यूट्यूबवर स्वत:च्या डान्सचे व्हिडिओ आणि क्लिप पोस्ट करणे सुरू केले. त्यांनी त्यांच्या नावाचे 'जोडी अनुरभ' असे रीब्रँडिंग केले. यूट्यूबवर त्यांचे 1.2M सब्सक्रायबर आहेत. तर इन्स्टाग्रामवर 903K फॉलोअर्स आहेत. दोघेही महिन्याला किमान 40 लाख रुपये कमावतात.
सौरभ एका मुलाखतीत म्हणतो, आम्हा दोघांनाही डान्सची आवड आहे आणि आम्ही तो सतत करत असतो, आमच्या लग्नानंतर आम्ही एक कपल ब्रँड सुरू केला. त्यांचे भविष्याबद्दलचे काय प्लॅन आहेत या बद्दल सांगताना सौरभ म्हणतो, आमचे ध्येय खरा आनंद पसरवणे आहे, आम्ही लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे तो वाढवण्याचा आम्ही मार्ग शोधत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.