Karnataka Viral News : नवजात बालकांना कुत्र्या-मांजरांपासून वाचवा असं आपले ज्येष्ठ लोक कायम सांगतात. पण नकळत, नजर चुकीने काही चुका होतात आणि दुर्घटना घडतात. अशीच एक घटना कर्नाटकातील शिवमोग्गा इथे घडली.
येथील सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील प्रसूती वॉर्डात कुत्रा पळत होता. मॅकगॅन जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने सांगितले की, त्यांना कुत्र्याच्या तोंडात मूल दिसले. मग तो त्याच्या मागे गेला.
कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर नेलं. आश्चर्याची बाब म्हणजे यादरम्यान कोणाचीही नजर कुत्र्यावर पडली नाही. सुरक्षा रक्षकाने बाहेर पाहिले असता त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.
कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मुलाच्या पालकांची अद्याप ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनानंतरच बाळाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदनानंतरच बाळाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळू शकेल. पालकांची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात गर्भवती महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जवळपासच्या सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.