Irshalwadi Landslide esakal
Trending News

Irshalwadi Landslide : महाराष्ट्रासाठी जुलै महिना ठरतोय काळरात्र! आधी माळीण, तळीये अन् आता इर्शाळवाडी डोंगराखाली

Raigad Irshalwadi Landslide: आधी माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी. निसर्गाच्या कोपाने या तिन्ही ठिकाणी मलब्याखाली शेकडो लोकांचा जीव गेला

साक्षी राऊत

Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरलाय, 30 कुटुंब मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. निसर्गाच्या कोपाने संपूर्ण गाव उध्वस्त झालं असून या ठिकाणी अनेक कुटुंब त्यांच्या आप्तस्वकियांना शेवटचं एक नजर भरून बघता येईल या आशेत वाट बघत बसली आहेत.

तर बचाव कार्यासाठी निघालेले जवान मलब्याखाली दबलेल्या लोकांच्या शोधात आहेत. जुलै महिना अनेक भागात दुर्दैवी काळ घेऊन आल्याचे दिसते. संपूर्ण महिन्यात देशाला हादरवून सोडणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आधी माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी. निसर्गाच्या कोपाने या तिन्ही ठिकाणी मलब्याखाली शेकडो लोकांचा जीव गेला.

आंबेगाव तालुक्यातील माळीण घटना

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला. धो धो कोसळणारा पाऊस थांबण्याची वाट बघत बसणारे गाव कधी डोंगरावरून आलेल्या चिखलाखाली गाडले गेले हे कळलेसुद्धा नाही.

माळीण हे घाटाच्या पश्चिम सीमेजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. माळीण गावात पर्जन्यमापकाची सोय नाही. त्यामुळे आसपासच्या पर्जन्यमापन केंद्रांवरून तेथील पावसाचा अंदाज बांधावा लागत असे.

३० जुलै २०१४ ला डिंभे धरणाच्या पर्जन्यमापकात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या ठिकाणी दररोज सकाळी आठला पाऊस मोजला जायचा. ३० तारखेच्या पहाटे आंबेगाव-जुन्नरच्या खोऱ्यात दर तासाला पावसाची स्थिती कशी होती, हे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या गोळेगाव-जुन्नर येथील स्वयंचलित पर्जन्यमापकावरून स्पष्ट होते. ३० तारखेच्या पहाटे ३.३० पर्यंत त्या केंद्रावर ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. साडेचारला त्याचे प्रमाण एकाएकी वाढून १०३ मिलीमीटर झाले. आणि संपूर्ण गाव डोंगरावरून कोसळणाऱ्या आक्रमक चिखलाखाली गाडले गेले. (Landslide)

तळीये गावातील दुर्घटना

२२ जुलैला तळीये गावातील काही भाग दुपारी १२ च्या सुमारास पहिल्यांदा डोंगराचा काही भाग खचला. डोंगर खचला म्हणून काही तरुणांनी त्याचे अक्षरश: व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले. पण कोणास ठाऊक होते की हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा व्हिडिओ ठरेल. डोंगराचा काही भाग कोसळला तेव्हा गावकऱ्यांना या काहीतरी मोठं घडेल याची चुणूक लागली असावी. (maharashtra Updates)

काही शेलारांनी आणि कुटुबियांनी त्यांची वस्ती खालच्या बासरवाडी पठारावर हलवली. अनेकांना शेलारांनी गाव सोडण्याचीही विनंत केली. दुपारच्या ४ वाजताच्या सुमारास संपूर्ण वाडी मागचा अक्खा डोंगर गावकऱ्यांवर कोसळा. या घटनेत ८१ मृत्यू झाल्याचे कळले होते तर ५५ मृत्यू शोधण्यात यंत्रणेला यश मिळाले होते.

वरील तिन्ही घटना जुलै महिन्यातच घडल्या होत्या. जुलै महिना या तिन्ही गावांसाठी काळ बनून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT