Lagaan Actress Gracy Singh birth day special lifestyle 
Trending News

Gracy Singh: लगानमधील ती निरागस गौरी सध्या करते तरी काय? दोन सुपरहिट दिले अन् गायब झाली

सकाळ डिजिटल टीम

ऑस्कर नॉमिनेटेड ‘लगान’ सुपरडुपर हिट चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे, ती निरागस गौरी. असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर संपूर्ण लगान चित्रपट उभा राहिला असणारच. ‘लगान’ रिलीज होऊन २३ वर्षांहून जास्त काळ लोटला असला तरी अभिनेत्री ग्रेसी सिंहने केलेलं पात्र अजुनही चर्चेत आहे. या चित्रपटात ग्रेसी सिंग आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत होती. ग्रेसीने मोजकचे चित्रपट केले पण सध्या तरी काय करते? कशी दिसते? असं अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत.

जर आज ग्रेसी तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. लगान चित्रपटानंतर म्हणजे २३ वर्षांत ग्रेसी खूप बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. 20 जुलै 1980 रोजी दिल्लीत जन्मलेल्या ग्रेसी सिंगने फार कमी चित्रपटांतून आपला ठसा उमटवला होता, पण तिचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. टीव्हीपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या ग्रेसीने मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू पसरवली.

सध्या ग्रेसी काय करते?

ग्रेसी सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. ग्रेसी सिंग ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. 2009 मध्ये ग्रेसीनं स्वतःची डान्स अकादमी उघडली, जिथे ती नृत्य शिकवते. यानंतर ती ब्रह्मा कुमारी संस्थेत सामील झाली आणि तिचा बहुतेक वेळ आध्यात्मिक प्रशिक्षण घेण्यात आणि देण्यात घालवते. ग्रेसी सिंगचे अद्याप लग्न झालेले नाही.

ग्रेसी सिंगच्या करिअरची सुरुवात द प्लॅनेट्स या डान्स ग्रुपमधून झाली. यानंतर 1997 मध्ये तिनं अमानत या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. 1999 मध्ये त्यांना सुंदर बाऊ या बंगाली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

तसेच, तिने हिंदी चित्रपटसृष्टीत हू तू तू आणि हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटातून प्रवेश केला. मात्र, ग्रेसीला खरी ओळख 'लगान' चित्रपटातून मिळाली. लगान खूप हिट ठरला आणि ग्रेसी रातोरात स्टार बनली.

यानंतर गंगाजल आणि मुन्ना भाई एमबीबीएस यांसारखे चित्रपटही ग्रेसीनं गाजवले. लगानने ग्रेसीला प्रसिद्धी मिळवून दिली, परंतु तिला गर्विष्ठ म्हणून देखील टॅग केले गेले. कारण, ग्रेसी एका खेड्यातील मुलीची भूमिका साकारण्यात इतकी तल्लीन झाली होती की ती सेटवर कोणाशीही बोलली नाही. अशा परिस्थितीत लोक तिला अहंकारी समजू लागले.

ग्रेसीने तिच्या करिअरमध्ये जवळपास 35 चित्रपटांमध्ये काम केले, पण तिला लगान, गंगाजल आणि मुन्ना भाई एमबीबीएससारखे यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत ती पुन्हा एकदा टीव्हीच्या दुनियेकडे वळली. संतोषी माँ या टीव्ही मालिकेत तिनं मुख्य भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT