viral video eSakal
Trending News

Viral Video: तेरा साथ ना छोड़ेंगे! मृत्यूपूर्वी तीन मित्रांनी एकमेकांना मारली घट्ट मिठी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Friends hugged each other in Flood: नदीमध्ये आलेल्या पुरापासून वाचण्यासाठी तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचं दिसत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काही मित्र असे असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत साथ सोडत नाहीत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नदीमध्ये आलेल्या पुरापासून वाचण्यासाठी तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचं दिसत आहे. तीन मित्र सोबत होते. त्यावेळी अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने ते संकटात सापडले.

सदर घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रिपोर्टनुसार, इटलीमध्ये एका बेटावर असलेल्या नदीमध्ये हे तीन मित्र अडकले होते. त्यांनी एकमेकांना घट्ट पकडलं, जेणेकरून ते वाहून जाणार नाहीत. पण, प्रवाह वाढतच गेला अन् काही काळाने हे तिन्ही मित्र वाहून गेले. या तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य एकाचा शोध सुरू आहे.

डेली मेलने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. २० वर्षांची पैट्रिजिया कॉर्मोस, २३ वर्षांची बियांसा डोरोस आणि २५ वर्षाचा बियांसा हिचा बॉयफ्रेंड क्रिस्टियन मोलनार या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे नदीच्या सेफ्टी झोनपासून काही मीटर आतमध्ये होते. जवळच असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार कैद झालाय.

घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर कॉर्मोस आणि डोरोस यांचे मृतदेह सापडले आहेत, पण मोलनार याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. बचावपथकाने सांगितलं की, जोपर्यंत मोलनारचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत शोध सुरु ठेवला जाईल. स्थानिकांनी सांगितलं की, त्यांना वाचवण्यासाठी नदीमध्ये दोरी टाकण्यात आली होती. पण, पाहता पाहता ते वाहून गेले.

प्रेमरियाकोचे मेयर मिशल डी सबाटा यांनी मृत तरुणांबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'तिन्ही तरुणांना परिस्थितीची माहिती नव्हती. ते फिरण्यासाठी तेथे गेले होते. नदीच्या अचानक बदलणाऱ्या स्थितीबद्दल स्थानिकांना माहिती होती, पण, तरुणांना याची कल्पना नव्हती. ऊन पडलं होतं, त्यामुळे तिन्ही मुलं त्याठिकाणी गेले होते. पण, त्यांना कळण्याच्या आधीच सर्व घडलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT