Viral Video Sakal
Trending News

Viral Video : एकीचे बळ! बिबट्याने केला जंगलातील वानरांच्या झुंडीवर हल्ला पण डाव उलटला

वानरांचा आणि बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये जंगली प्राणी, विनोदी डान्स, लग्नातील विनोद, कार्यक्रम, लहान मुले, सीसीटीव्ही फुटेज, अपघात अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. जंगलातील व्हिडिओ नेटकऱ्यांंच्या चांगल्याच पसंतीत उतरत असतात. सध्या बिबट्याचा आणि वानरांच्या झुंडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जंगलात वाघ, सिंह आणि बिबट्या हे प्राणी आपली दादागिरी गाजवत असतात. इतर प्राण्यांवर यांच्याकडून हल्ला होत असतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या भर रस्त्यावर वानरांच्या झुंडीतील एका वानरावर हल्ला करत आहे. या झुंडीमध्ये जवळपास ५० वानरे दिसत असून हल्ला झाल्यानंतर वानरांनी एकीचे बळ काय असते ते दाखवून दिलं आहे. वानरांच्या झुंडीने एकटा असलेल्या बिबट्यावर प्रतिहल्ला केला. हा प्रतिहल्ला पाहून बिबट्याला मैदान सोडावं लागलं आहे.

दरम्यान, वानरांनी जर यावेळी एकी दाखवली नसती तर बिबट्याने वानराची शिकार केली असती. यावरून एकीचे बळ असेल तर काय होऊ शकते याची प्रचिती आपल्याला येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाने जेतेपद राखले! फायनलमध्ये चीनला पराभवाची धुळ चारत तिसऱ्यांदा ठरले चॅम्पियन

Ulhasnagar Assembly Elections Voting : उल्हासनगरमध्ये भाजप उमेदवारांवर मतदारांना पैसे वाटल्याचा मनसे उमेदवाराचा आरोप

SCROLL FOR NEXT