madhya pradesh three idiots style delivery doctor live over phone call  
Trending News

पुरामुळं पोहचली नाही रुग्णवाहिका; अमिर खानच्या फिल्मी स्टाईलनं केली महिलेची प्रसुती

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ट्रेनमध्ये रेल्वेची प्रसुती, रेल्वेरुळावर महिलेची प्रसुती, रुग्णालयात नेताना वाटेत प्रसुती, अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत आणि आपल्या आवतीभोवती होत असतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. (madhya pradesh three idiots style delivery doctor live over phone call )

मंगळवारी मध्य प्रदेश येथील जोरावाडी गावात राहणाऱ्या महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. सततच्या पावसामुळे गावाजवळील नाला तुडुंब भरला होता. त्यामुळे रुग्णवाहिका महिलेपर्यंत पोहोचू शकली नाही. तातडीने ही माहिती शासकीय रुग्णालयाच्या डॉ. मनिषा सिरसाम यांना देण्यात आली.

त्यानंतर डॉ. सिरसाम यांनी आशा वर्करशी संवाद साधला. डॉ. सिरसाम यांनी आशा वर्करशी बोलल्यानंतर गावातील प्रशिक्षित सुईणीशी संपर्क साधून तिला महिलेच्या घरी पाठवलं. यानंतर डॉ.मनिषा यांनी सुईणीला फोनवरून प्रसूतीची माहिती देत ​​महिलेची सुखरूप प्रसूती करून घेतली.

महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला, नाल्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महिलेला आणि दोन्ही मुलांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आणि तिची दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहेत.

'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रसुती

यावर डॉ.मनिषा सिरसाम यांनी सांगितले की, रवीना या महिलेला अचानक प्रसुती कळ्या होऊ लागल्या. पण नाल्यात पूर आल्याने महिलेला घेण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही.

त्यानंतर आशा वर्करशी बोलल्यानंतर गावातील प्रशिक्षित सुईणी रेश्ना वंशकर यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आणि मी तिला फोनवर प्रसूतीबाबत सांगत राहिले, त्यानंतर महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला.

ही घटना ऐकून गावातील सर्व मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत. महिला आणि तिचे कुटुंब खूप आनंदी आहे. डॉक्टरांनी सांगितले की काही दिवसात महिलेला तिच्या घरी पाठवले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT