Maharashtra Agricultural Day 2023 esakal
Trending News

Maharashtra Krishi Din : आज जनतेचं पोट भरणाऱ्या बळीराजाच्या सन्मानाचा दिवस, जाणून घ्या इतिहास अन् महत्त्व

भारतीय टपाल विभागाने शेत, शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे जारी केली आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

Agricultural Day 2023 : महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते.

कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या महाराष्ट्रावर अवलंबून आहे. ओलादुष्काळ,कोरडा दुष्काळ, आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून, दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे. अशा परिस्थितीत शेती,माती आणि शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

कृषी दिनाचा नेमका इतिहास काय आहे ?

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते.

त्यांच्या जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. १९६३ ते १९७५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. जेव्हा पासुन वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे सांगितले जाते. (Vasantrao Naik)

महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व काय आहे ?

महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे, कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिली. या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. भारतीय टपाल विभागाने शेत, शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे जारी केली आहेत. (Agriculture Day)

या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कृषी दिन शेतक-यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरुकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT