kokani man copied chand nawab nawazuddin siddiqui malwani chand nawab railway station Video goes Viral  
Trending News

Viral Video : मालवणी 'चाँद नवाब' पाहिला का? तुफान व्हायरल होतंय आंगणेवाडीच्या जत्रेचं रिपोर्टींग

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला प्रसिध्द अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात रिपोर्टर 'चांद नवाब'ची भूमिका आठवतेय का? अशाच एका कोकणी चांद नवाबचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. हा चाँद नवाब आंगणेवाडीच्या जत्रेला निघालेल्या भाविकांचं रिपोर्टींग करताना दिसत आहे.

नुकताच मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील असाच चांद नवाब स्टाइल व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवर उभा रिपोर्टर 'चांद नवाब'ची ती खास रिपोर्टींगची स्टाइल कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये येणारा प्रत्येक प्रवासी त्या रिपोर्टला त्रास देताना दिसत आहे. ज्यामुळे लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान हा मालवणी चाँद नवाब वारंवार रिटेक घेताना दिसत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाइक केला आहे आणि तो जोरदारपणे शेअरही करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती पुलावर उभी राहून लाइव्ह रिपोर्टिंग करत आहे. लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान लोक कॅमेऱ्या समोरून जात आहेत ज्यामुळे रिपोर्टर चिडतो आणि मालवणी भाषेत त्यांना उत्तरं देतो.

तो पुन्हा पुन्हा रिटेक घेताना दिसतो. हा व्हिडिओ मालवणी भाषेत बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्सदेखील तयार झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT