Old Currency in India Sakal
Trending News

Old Currency in India: तुम्ही कधी ७५ रुपयांचं नाणं पाहिलंय का? या व्यक्तीकडे आहे भारतातील सर्वात जुन्या काळातले पैसे

त्यांनी सर्व प्रकारची नाणी आणि नोटा जमा करून एक संपूर्ण संग्रहालय तयार केलं आहे.

वैष्णवी कारंजकर

आत्तापर्यंत आपण आपल्या घरातल्या वडिलधाऱ्यांकडून ऐकलं असेल की एके काळी एक पैसा, दोन पैशांसह इतर प्रकारची नाणी चलनात होती, पण हा सगळा संग्रह पाहिला असेल असे फार कमी लोक असतील. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ इथले पेंट व्यापारी अजय कुमार गोयल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रकारची नाणी आणि नोटा जमा करून एक संपूर्ण संग्रहालय तयार केलं आहे.

लोकल-18 शी बोलताना अजय कुमार गोयल म्हणाले की, भारत सरकार विशेष सणांच्या दिवशी नाणी किंवा नोट जारी करेल याची ते नेहमी वाट पाहत असतात, जी ते त्यांच्या संग्रहालयात जमा करू शकतात. त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे 750 रुपयांची नाणी, 1000 रुपयांची नाणी, 550 रुपयांची नाणी, 75 रुपयांची आणि 100 रुपयांची नाणी आहेत. इतकंच नाही तर विशेष सण आणि महापुरुषांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने जारी केलेले प्रत्येक चलन त्यांच्या संग्रहात दिसेल.

एक पैसा, दोन पैसे, तसेच भारत सरकारने जारी केलेल्या नोटांसह आतापर्यंत जारी केलेली विविध नाणी पाहायची असतील, तर अजय गोयलकडे या. एवढेच नाही तर त्यांना भारत सरकारने जारी केलेल्या एक रुपयाच्या ६५ प्रकारच्या नोटाही पाहायला मिळतील.

भारत सरकारने आतापर्यंत 2 रुपयांच्या 36 नोटा, 5 रुपयांच्या 46 नोटा आणि 10 रुपयांच्या 147 नोटा जारी केल्या आहेत. त्यांच्याकडे या सर्वांचा संग्रह आहे. त्यांनी जुनी नाणी आणि नोटाही तारखेसह फाइलमध्ये ठेवल्या आहेत. जेणेकरून सर्वसामान्यांना समजणे सोपं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT