manali tourist drive mahindra thar suv in Chandra river Video goes viral in Himachal Pradesh Traffic Jam  
Trending News

Viral Video : वाह रे पठ्ठ्या! ट्राफिकमधून वाचण्यासाठी थेट नदीत घुसवली थार; पडलं चांगलचं महागात

सलग सुट्ट्यांमुळे देशातील सर्वत पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले,

रोहित कणसे

हिमाचल प्रदेशमधील एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटत महिंद्रा थार गाडी चंद्रा नदीतून चालवताना दिसत आहे. मात्र या पर्यटकाला कार नदीत घुसवणं चांगलंच महागात पडलं, हिमाचल पोलिसांनी त्याला चांगलाच दंड ठोठावला आहे.

ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या स्वागतानिमीत्त सुट्ट्यांसाठी लोक मोठ्या संख्यने हिल स्टेशनकडे धाव घेत आहेत.त्यामुळे रस्त्यांवर लांबचलांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. मागितल तीन दिवसात हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे तब्बल ५५,००० गाड्या अटल टनल मधून गेल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, येथील लाहौल जिल्ह्याचे एसपी मयंक चौधरी यांनी या व्हायरल व्हिडीओबद्दल माहिती दिली की सध्या एख व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक थार लाहोल-स्पीति येथे चंद्रा नदी ओलांडून जाताना दिसत आहे. मोटर वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत त्या व्यक्तीकडून दंड आकारला आहे. भविष्यात असं कोणी करून नये म्हणून त्या ठिकाणी पोलिस देखील तैनात केले आहेत.

कुल्लू जिल्ह्यात पर्यंटकांची गर्दी झाल्याने लाहौल-मनाली रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एका व्यक्तीने त्याची थार गाडी चंद्रा नदीत घुसवली होती. इतकेच नाही तर कार चालवत दुसऱ्या किनाऱ्यावर देखील पोहचला. दरम्यान या दरम्यान काढण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर लगेच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

शिमला येथील पोलिस महानिदेशक संजय कुंडू यांनी पर्यटकांना सुरक्षित प्रवासासाठी वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या स्वागतासाठी या आठवज्यात शिमला येथे एक लाखाहून अधिक वाहने दाखल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राज्य स्थिती व्यवस्थित मॅनेज करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT