आजच्या युगात मोबाईल हा प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. फोनशिवाय काही लोक तर जगण्याचा विचारही करू शकत नाहीत. सतत त्यांना मोबाईल हवा असतो. अलीकडे आपल्या सगळ्या डिटेल्स मोबाईलमध्ये असतात. अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल हरवल्यास तुम्ही फार मोठ्या अडचणीत सापडू शकता. त्यामुळे मोबाईल हरवल्यास तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या ट्रीक्स महत्वाच्या ठरतात.
सर्वप्रथम तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा
तुमचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी गेल्यास सर्वप्रथम तुम्ही तुमते सिम कार्ड ब्लॉक करा. यामुळे तुमच्या सिम नंबरशी लिंक्ड असलेल्या कुठल्याच गोष्टीचा ओटीपी अन्य कोणास जाणार नाही. त्यामुळे तुमच्या बँक डिटेल्सशी कोणी छेडछाड करणार नाही. तुम्ही तुमच्या जुन्या सिमचा नंबर नवीन सिममध्ये सक्रिय करू शकता. टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही तुमचं सिम परत सक्रिय करू शकता.
मोबाईल बँकिंग ब्लॉक करा
लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही फोनच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक डिटेल्स आणि बँक खाती ब्लॉक करू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटसाठी ऑनलाईन बँकिंग वापरत असता. या खात्याचा मोबाईल चोरी गेल्यास गैरवापर होऊ नये म्हणून हे गरजेचे आहे. बँकेला कॉल करून देखील तुम्ही खाती ब्लॉक करू शकता.
मोबाईल वॉलेटचा अॅक्सेसदेखील ब्लॉक करा
फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास बँक खात्यातील तसेच मोबाईल वॉलेटमधील अॅक्सेस ब्लॉक करा. कारण तुम्ही अनेक ठिकाणी पेमेंटसाठी वापरलेल्या अॅक्सेसचा चोर गैरवापर करू शकतात.
CIER पोर्टलवरून फोन ब्लॉक करा
तुम्ही सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करू शकता. तसेच याच्या मदतीने फोन ट्रॅकही करता येऊ शकतो.
पोलिस स्टेशनला तक्रार करा
जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. जेणेकरून कोणी तुमच्या फोनचा गैरवापर करू शकणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.