मुंबई : कांदिवली पूर्वेला सरोवर टॉवर या इमारतीच्या, 32 व्या मजल्यावर अडकलेल्या एका 70 वर्षीय वृध्द मानसिक रुग्णाची अग्निशमन दलाने यशस्वी सुटका केली आहे. वृध्द रहिवासी हा सरोवर टॉवर इमारतीतील रहिवासी असून तो मानसिक रुग्ण आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टॉवरच्या 32 व्या मजल्याच्या 4 फूट सुरक्षा भिंतीवर चढून सुमारे 6 फूट खोल इमारतीच्या पुढच्या भागातील जागेत उतरला होता. या जागेच्या एका बाजूला खोल दरी सारखा इमारतीचा बाहेरचा परिसर होता. या जागेत ही व्यक्ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत बसली होती. स्थानिक रहिवाशांनी अग्नी शामक दलाला माहिती देताच तातडीने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी सेफ्टी हार्नेस आणि दोरी वापरून त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली.. अतिशय कसोशीने शर्थीचे प्रयत्न करून वृद्धाचे प्राण वाचवण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.