Nita Ambani Dons A Gayatri Mantra Printed Red Saree Anant Ambani and Radhika Merchant's pre-wedding ceremonies 
Trending News

Nita Ambani: लाल भडक साडीत वरमाईचा तोरा! निता अंबानी यांनी नेसलेली साडी करतेय हिंदू धर्माचा प्रसार

सकाळ डिजिटल टीम

मुलाच्या लग्नाच्या धामधुमीत वरमाईचा तोरा काही वेगळाच पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पण देशभरात मुलाच्या लग्नापेक्षा निता अंबानी यांच्या साड्यांची चर्चा अधिक रंगली आहे. नुकतंच त्यांचे लाल रंगाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या साडीद्वारे त्या हिंदू धर्माचा प्रसार करताना दिसत आहेत.

मुलाच्या लग्नापुर्वी अंबानी कुटुंबियांनी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या विवाह सोहळ्याचा 50 जोडप्यांनी सात फेरे घेतले. या सोहळ्याला संपूर्ण अंबानी परिवार उपस्थित होता पण निता अंबानी यांच्या लाल रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

निता अंबानींच्या साडीचे थेट हिंदू धर्माशी कनेक्शन

निता अंबानी यांनी सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान लाल रंगाची हेवी सिल्क साडी परिधान केली होती. ज्याचे थेट कनेक्शन हिंदू धर्माशी आहे. तर कसं काय? निता यांच्या या साडीवर काहीतरी लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. तर ते झुम करुन पाहिल्यास गायत्री मंत्र असल्याचे उघड होते.

निता अंबानी यांचा हा लुक एखाद्या नव्या नवरीसारखा दिसत आहे. या साडीसोबत त्यांनी हेली ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांचा हा लुक पाहून तुमचा विश्वास बसणार की त्या ६० वर्षाच्या आहेत.

या सोहळ्यादरम्यान निता अंबानी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मी एक आई आहे आणि एका आईला आपल्या मुलांच्या लग्नात जो आनंद होतो तोच आनंद मलादेखील झाला आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. हा लग्नसोहळा मुंबईतच होणार आहे. आत्तापर्यंत कुटुंबाने लग्नाआधी दोन कार्ये केली आहेत. एक जामनगर आणि दुसरं इटलीमध्ये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT