Osho esakal
Trending News

Osho: संभोग ते समाधी..! समज की गैरसमज? भारतात याचा तिरस्कार का होतो जाणून घ्या एक क्लिकवर

मध्यंतरी ओशोबाबत बऱ्याच चर्चा व्हायला लागल्या होत्या

सकाळ ऑनलाईन टीम

Osho: ओशोचं नाव घेताच संभोग ते समाधी हे वाक्य जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ओशोच्या जिथे चांगल्या विचारांचा झरा आजही जीवंत आहे तेथे तेवढ्याच प्रमाणात त्याचा तिरस्कार करणारे लोकही तुम्हाला बघायला मिळतील. मध्यंतरी ओशोबाबत बऱ्याच चर्चा व्हायला लागल्या होत्या. आजच्याच दिवशी ओशोचा जन्म झाला होता. त्यानिमित्ताने ओशोबाबत लोकांचा समज योग्य आहे की गैरसमज? ते आपण जाणून घेऊया.

आचार्य रजनीश यांची इंग्रजी आणि हिंदी भाषणे ऐकली तर त्यांचे भाषेवरील आणि विषयावरील प्रभुत्व लक्षात येते. परंतु भाषण किंवा लेखन वेगळे आणि व्यावहारिक जीवन वेगळे. ते स्वतः काहीही सांगत असले तरीही त्यांच्या शिष्यगणांचे वर्तन मात्र आपल्या पारंपारिक संस्कारात बसण्यासारखे नव्हते. महाराष्ट्रात जर संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास किंवा नामदेव महाराजांनी जो काही आध्यात्ममार्ग दाखवला त्यापेक्षा त्यांचा मार्ग फारच वेगळा आहे जो पारंपारिक विचाराच्या भारतीय माणसाला पटकन रुचण्यासारखा नाही त्यामुळे त्यांच्या विचारला विरोध व्हायचा.

पाश्चिमात्य लोकांना त्यांची विचारसरणी ही पटकन मानवणारी आहे त्यामुळे त्यांच्या तत्कालीन शिष्य वर्गात बहुसंख्य विदेशी नागरिक दिसायचे. कामभावनेबाबत जेवढे ओशोने स्पष्ट मत मांडले तेवढे कदाचितच कोणी मांडले असेल. मात्र हा विचार भारतात तरी सर्वांना पटण्यासारखा नव्हता. त्यामुळे भारतात याचा सर्वाधिक तिरस्कार करण्यात आला.

ओशो यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती कशी मिळाली?

ओशो हे एक जागृत व्यक्तीमत्व आहे. व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक डिवाइन एनर्जी त्यांच्याद्वारे कार्य करत असते अशी एक भावना लोकांच्या मनात जागृत होत होती. ओशो जेव्हा प्रवचन देत असत तेव्हा जगातील त्यांचे सर्व शिष्य त्यांच्याकडे ओढले जात असत.

जगातून अनेक साधक त्यांच्याकडे मॅग्नेटिक फोर्स प्रमाणे ओढले जात असत.ओशो हे काळाच्या खूप पुढे असल्यासारखे अनेकांना वाटे. त्यांची प्रवचन व पुस्तके व्हिडिओज सर्व जगभरामध्ये आज ऐकले व पाहिले जातात. ओशोंनी ध्याना बरोबरच जगातील सर्व प्रश्नांना त्यांच्या प्रवचनातून उत्तरे दिली. तेथूनच त्यांची जगभरात ख्याती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT