10-year-old boy raped in Pakistan, Objectionable videos shared on social media esakal
Trending News

Pakistan Child Abuse: पाकिस्तानमध्ये अत्यंत किळसवाणी घटना! अंघोळीच्या बहाण्याने 10 वर्षाच्या मुलाला नेलं अन्...; आरोपीकडून व्हिडिओ व्हायरल

Saisimran Ghashi

Pakistan : लहान मुलींसह आता लहान मुलांवर देखील अत्याचार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यांना डिजिटल पद्धतीने ब्लॅकमेल करून वारंवार त्यांचे शोषण करणे,त्यांच्या कडून अवैध कामे करून घेणे असे गुन्हे मोठ्या प्रमावर घडत आहेत. अशीच एका अत्याचाराची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. मुलांवर पाकिस्तानमधील मुझफ्फरगडमध्ये एका 10 वर्षांच्या मुलावर बलात्कार करून त्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संशयिताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केले, असे एका वृत्ताने समोर आले आहे.

ही घृणास्पद घटना जतोई तहसीलच्या बेट मिरहजार खान परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गुन्ह्यामुळे मुलांची सुरक्षा आणि डिजिटल शोषणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली.बेट मिरहजार खान पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने आंघोळीच्या खोट्या बहाण्याने तरुण मुलाला ट्यूबवेलमध्ये नेले.

वृत्तानुसार, नंतर या रेकॉर्डेड टेपचा वापर मुलाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये , हे प्रकरण मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर प्रकाश टाकते.

स्वाबी-हरिपूर जिल्ह्याच्या सीमेजवळील आणखी एका घटनेत, पोलिसांनी एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. ही महिला हरिपूर जिल्ह्यातील संशयितांची नातेवाईक असल्याचे समजते. बाचा खान टीचिंग हॉस्पिटल, शाहमनसूर येथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि या अतिप्रसंगाची पुष्टी झाली,अशी माहिती वृत्तामधून समोर आली.

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे उटला पोलिस स्टेशनचे एसएचओ जिहाद खान यांनी सांगितले. सध्या संशयितांवर (इतिखार खान आणि सरताज खान) कायदेशीर कारवाई सुरू आहे.

अश्या घाणेरड्या वृत्तीचे लोक आपल्या आसपास असू शकतात. जे तुमच्या लहान मुलांवर नजर ठेऊन असतील. अश्या लोकांपासून तुमच्या लहान मुलांना सावध करण्यासाठी त्यांना गुड टच आणि बॅड टचची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT