Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg esakal
Trending News

Narendra Modi : इंडोनेशियानंतर PM मोदींनी नागपुरात वाजवला ढोल; सगळे बघतच राहिले, पाहा अफलातून Video

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातही PM मोदींनी ढोल वाजवला होता.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातही PM मोदींनी ढोल वाजवला होता.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचं (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यामुळं समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आज (रविवार) सकाळी नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नियोजित कार्यक्रमानुसार नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा आणि समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी हे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास वायफळ टोलनाक्यावर आले. याठिकाणी त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं.

यावेळी पंतप्रधान मोदींनी ढोलही वाजवला. PM मोदींचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. ढोल वाजवताना पंतप्रधान खूप आनंदी दिसत आहेत. दुसरीकडं ढोलवादक कलाकारानंही मोदींसोबत ढोलवादनाचा आनंद घेतला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातही PM मोदींनी ढोल वाजवला होता. G 20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ढोलवादन केलं होतं.

एकूण 701 किमी लांबीचा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला आहे. हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. यात अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांचा समावेश आहे. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींनी नागपुरात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. यादरम्यान, सुमारे 590 कोटी आणि 360 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. यानंतर पीएम मोदींनी नागपूर मेट्रोनं फ्रीडम पार्क ते खापरी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. नागपूर मेट्रोच्या फ्रीडम पार्क स्टेशनवर पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केलं. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपुरात आगमन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT