Cab Driver’s Guidelines For Passengers Go Viral 
Trending News

'भैय्या म्हणू नका ते तुमचा अ‍ॅटिट्यूड तुमच्या खिशात ठेवा', कॅब चालकाचे प्रवाशांसाठीचे नियम सोशल मीडियावर व्हायरल

रोहित कणसे

सोशल मीडियामध्ये दररोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यादरम्यान एक टॅक्सीचालकाने प्रवाशांसाठी तयार केलेली नियमावली सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या नियमांमध्ये 'आम्हाला भैय्या म्हणू नका' असा नियम देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर यावरून वाद रंगला असून काही जण हे नियम खूपच कडक असल्याची तक्रार करत आहेत, तर अनेक जण या नियमांचे समर्थन देखील करत आहेत.

या नियमावलीत या कॅब ड्रायव्हरने प्रवाशांना "तुमचा अ‍ॅटिट्यूड तुमच्या खिशात ठेवा, आम्हाला दाखवू नका. कारण तुम्ही काही आम्हाला जास्त पैसे देत नाहीत" असेही बजावले आहे. इतकेच नाही तर या कॅब चालकाने प्रवाशांना तुम्ही गाडीचे मालक नाहीत, गाडी चालवणारा व्यक्ती गाडीचा मालक आहे हे देखील लक्षात ठेवण्यास सांगितले आहे.

या नियमावलीतील 'आम्हाला भैय्या म्हणून नका' हा नियम अनेकांना खटकताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हे अनावश्यक आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी बाकीचे सर्व मुद्दे ठीक आहेत पण एखाद्याला भैय्या म्हणून संबोधण्यात काही गैर नसल्याचे म्हटले आहे.

या कॅब चालकाने त्याच्या नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जरी प्रवाशी सर्व्हिसच्या बदल्यात गाडी भाड्याचे पैसे देत असले तरे ते गाडीचे मालक नाहीत. यासोबतच त्यांने काही सामान्य शिष्टाचाराच्या महत्वावर देखील जोर दिला आहे. जसे की गाडीतून उतरताना दरवाजा हलू लावा आणि आदराने बोला. अनेकांनी त्याच्या या मागणीचे कौतुक देखील केले आहे.

काही इंटरनेट यूजर्सनी या सूचनांमध्ये काहीही गैर नसून कॅब ड्रायव्हरच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांना आपल्या देशात कॅब ड्रायव्हर्स, डिलीव्हरी बॉय अशा लोकांना कमी लेखले जाते असेही नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाचा २५ वा वाढदिवस; कर्करोगाबद्दल कळलं पण 'ती' चूक जीवावर बेतली, अतुल यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?

Maharashtra MLC: राज्यपाल नियुक्त 12 ऐवजी 7 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब? या महत्वाच्या नावांची चर्चा

Atul Parchure Death: अतुल परचुरे यांच्या निधनाने अशोक सराफ यांना अश्रू अनावर; म्हणाले- तो पटकन निघून गेला हेच...

Raj Thackeray-Atul Parchure: कशी होती राज अन् अतुल परचुरेंची मैत्री? ऐकून डोळ्यात येईल पाणी!

अतुल परचुरे यांच्या आजारपणात नाना पाटेकरांनी केलेला सोनियाला फोन; मित्रासाठी केलेली खास गोष्ट, म्हणालेले- काहीही...

SCROLL FOR NEXT