rajgurunagar woman Hitting Suryakumar Yadav Supala Shot in Street Cricket video goes viral on social media 
Trending News

Supla shot viral video: काकूंनी पदर खोचून ठोकला दणदणीत सुपला शॉट ! सूर्याची 'लाडकी बहीण' राजगुरूनगरमध्ये?

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट जगतात प्रत्येक क्रिकेटरलला त्याच्या खेळाच्या शैलीनुसार ओळखले जाते. इतर खेळाडूंप्रमाणे टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवदेखील त्याच्या सुपला शॉटमुळं ओळखला जातो. पण असाच शॉट एखाद्या काकुने मारला तर. तुमच्या भुवया उंचावतील. हो ना.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ कधील आहे माहिती नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, कान्हेवाडी बुद्रुक राजगुरूनगर येथील आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साडीमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. कदाचित हा व्हिडीओ क्रिकेट स्पर्धेतील असल्याचे समजते. कारण, या व्हिडीओमध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळत आहे.

सूर्यकुमार यादवची सख्खी चुलत मावस बहीण...सुपला शॉट असं वाक्य या व्हिडीओवर लिहण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये महिला चेंडू येताच बॅट खाली टेकवत शानदार चौकार मारते. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. महिलेची स्टाईल पाहून सर्वांना सूर्यकुमार यादवच्या सुपला शॉटची आठवण झाली.

तर सूर्यकुमार यादवच्या 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट

एका मुलाखतीदरम्यान सूर्यकुमारने या शॉटबद्दल माहिती दिली होती. लहानपणी टेनिस चेंडूने क्रिकेट खेळताना हा फटका मारण्यास शिकलो असल्याचे सूर्यकुमारने म्हटले आहे.

‘इन द नेट’ कार्यक्रमात सूर्यकुमारने या फटक्याची माहिती सांगितली. तो म्हणाला की, ‘मला वाटते की, या फटक्याचे नाव मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटवरून आले आहे.

मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा फटका मारण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी या फटक्याशी माझं नाव जोडले आणि त्याला एक नाव दिले. जेव्हा हा फटका खेळला जातो आणि त्याला ‘सुपला शॉट’ असे म्हटले जाते आणि हे ऐकायला चांगले वाटते.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT