Rat Sakal
Trending News

Rat Murder Case: उंदराची हत्या केल्याचा आरोप! तरुणावर FIR, 30 पानी आरोपपत्र दाखल

जगातील सर्वात उपद्रवी प्राणी असलेल्या उंदराला जीवे मारणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगातील सर्वात उपद्रवी प्राणी असलेल्या उंदराला जीवे मारणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. उंदराची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्यावर ३० पानी आरोपपत्र देखील दाखल केलं आहे. (Rat Murder Case FIR and 30 page charge sheet has been filed against accused)

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील पनबडिया या गावात ही घटना घडली. मनोजकुमार यानं घरातून उंदीर पकडला त्यानंतर त्यानं या उंदराच्या शेपटीला दगड बांधला आणि त्याला नाल्यामध्ये बुडवलं. हे कृत्य करत असताना तिथूनच प्राणीमित्र विकेंद्र शर्मा जात होते. विकेंद्र यांनी मनोजला असं करण्यापासून थांबवलं, पण तो त्यांच्याशी वाद घालायला लागला.

दरम्यान, दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्यानं शर्मा यांनी पोलिसांत धाव घेत आरोपी मनोजवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर मृत उंदराला बरेलीतील रुग्णालयात पोस्टमॉर्टम केलं. पोस्ट मॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर शर्मा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्या फिर्यादीवरुन प्राणी हत्या कायद्यांतर्गत आरोपी मनोजवर गुन्हा दाखल केला. यानंतर मनोजची जामिनावर सुटकाही झाली. आता पोलीस उंदराच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

३० पानी आरोपपत्र दाखल

या प्रकरणात पाच महिन्यांच्या तपासासानंतर उंदराच्या हत्येप्रकरणी आरोपी मनोजविरोधात ३० पानी आरोपपत्र तयार केलं आहे. यानतंर आरोपीला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावर आता कोर्ट काय निकाल देतंय हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT