rrr naatu naatu song arvind kejriwal bhagwant mann dance video viral aap on winning golden globes award  
Trending News

Natu Natu : भगवंत मान-केजरीवालांचा 'नाटू-नाटू' डान्स पाहून रामचरण-NTRला येईल चक्कर, Video Viral

सकाळ डिजिटल टीम

भारतीय चित्रपट जगतासाठी बुधवार हा एक संस्मरणीय दिवस ठरला. कारण SS राजामौली यांच्या RRR चित्रपटाने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकला आणि इतिहास रचला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात भारतीय गाण्याला मिळालेल्या सन्मानानंतर या गाण्याच्या निर्मात्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

यादरम्यान आम आदमी पार्टीने (आप) चित्रपटाच्या टीमचे या यशाबद्दल वेगळ्या आणि अतिशय अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. या गाण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दमदार डान्सचा व्हिडिओ 'आप'ने पोस्ट केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आप (AAP)ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला एक व्हिडिओ

आपच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर RRR चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अभिनंदन RRR तुम्ही भारताचा गौरव वाढवला आहे. नाटूनाटू हे गाणे गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारे पहिले आशियाई गाणे ठरले आहे.

या पोस्टमध्ये, जिथे चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी (MM Keeravani) यांचा फोटो पुरस्कारासह शेअर करण्यात आला होता, सोबत गाण्याच्या मूळ व्हिडिओचे रिमिक्स व्हिडिओ व्हर्जनही शेअर करण्यात आले होते.

AAP ने चित्रपटाचा मूळ व्हिडिओ शेअर केला आहे, परंतु व्हिडिओ एडिटिंगकरून अरविंद केजरीवाल यांचा चेहरा रामचरणच्या चेहऱ्याच्या जागी आणि भगवंत मान यांचा चेहरा हा ज्युनियर एनटीआरच्या चेहऱ्याला चिकटवण्यात आला आहे.

त्यामुळे केजरीवाल आणि मान या दोन्ही सिनेतारकांच्या डान्स स्टेप्सवर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सुमारे 7 तासांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता आणि त्याला 42 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT