सातारा : इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या चेष्ठेमुळं संबंधित मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळं सोशल मीडियावरुन सुरु असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे. साताऱ्यात ही घटना घडली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
एका मुलीनं मनिष नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केलं आणि या अकाऊंटवरुन आपल्या मैत्रिणीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फ्रेन्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. यानंतर फसवली गेलेली तरुणी इन्स्टावर मैत्री झालेल्या या खोट्या मनिष नावाच्या मुलाच्या प्रेमातच पडली. यावेळी ती वारंवार मनिषला भेटण्याचा आग्रह करत होती.
पण यामुळं मनिषचं अकाऊंट चालवणारी तिची मैत्रीण गोंधळली आणि हा खेळ थांबवण्यासाठी आणि यापासून कायमची सुटका करुन घेण्यासाठी आणखी एक फेक अकाऊंट सुरु केलं आणि त्यावरुन मनिष मरणं पावल्याचं तिला सांगितलं तसंच रुग्णालयातील खोटे फोटोही तिला दाखवले. यामुळं धक्का बसलेल्या या २४ वर्षीय तरुणीनं नैराश्यातून गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.
वाठार पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी चौकशी सुरु असताना हे लक्षात आलं की, मुलाच्या नावाचं जे युजरनेम होतं आणि इतरही काही चार-पाच युजरनेम होते ते एकाच व्यक्तीकडून वापरलं जात होतं. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मैत्रिणीकडूनच ही सर्व युजरनेम वापरली जात होती. अशा प्रकारे मुलाच्या नावानं या मुलीनं आपल्या मैत्रिणीला फसवलं. एक प्रकारे तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं. यामुळं संबधित तरुणी डिप्रेशनमध्ये गेली आणि तीनं हे गंभीर पाऊल उचललं. त्यामुळं यामध्ये एक जीव गेलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.