how to close aadhar card after death Esakal
Trending News

Aadhar Card After Death: मृत्यूनंतर बंद होणार आधार कार्ड कुटुंबियांना द्यावी ही लागणार माहिती

how to close aadhar card after death: भारतातील India प्रत्येक नागरिकाकडे मग तो शालेय विद्यार्थी असो वा वयोवृद्ध आधार नंबर असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड महत्वाचं आहे हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहेच. मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या आधार कार्डचं काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल

सकाळ डिजिटल टीम

How to close aadhar card after death: प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचं असलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. बँकेत खातं उघडणं, पासपोर्ट, मालमत्ता खरेदी-विक्री, नोकरी किंवा कोणतही सरकारी काम एवढचं काय तर खासगी कार्यालयातही आधार कार्ड हे तुमचं अधिकृत ओळखपत्र म्हणून स्विकारलं जातं.

एकूणचं काय तर आजच्या घडीला तुम्ही कोणतही काम करायला जा आधार कार्ड असणं अपरिहार्य आहे. Status of UID Aadhar Card after Death

भारतातील India प्रत्येक नागरिकाकडे मग तो शालेय विद्यार्थी असो वा वयोवृद्ध आधार नंबर असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड महत्वाचं आहे हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहेच. मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या आधार कार्डचं काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

अनेक देशांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर Death त्या व्यक्तीची महत्वाची ओळखपत्र ही डिअॅक्टिव्हेट केली जातात. मात्र भारतात अद्याप अशी कोणतीही तरतूद नाही. तर सध्य स्थितीत व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचं आधार कार्ड हे सुरूच राहतं.

म्हणजेच ते डिअॅक्टिव्हेट होत नाही. अदयाप मृत व्यक्तीच आधार कार्ड बंद डिअॅक्टिव्हेट म्हणजेच निष्क्रिय करण्याची कोणतीही तरदूत अस्तित्वात नाही.आधार सुरू राहिल्याने त्याचा दुरूपयोग होवू शकतो. मात्र असं असलं तरी लवकरच आधार कार्ड निष्क्रिय करण्याचा नियम लागू होवू शकतो.

मृत्यू प्रमाणपत्रासोबतच आधार कार्ड होणार निष्क्रिय

आधार कार्ड Aadhar card हस्तांतरीत करणारी संस्था यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यावर सध्या काम करत आहे.

रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया ही संस्था देशातील जन्म आणि मृत्यू यांचा रेकॉर्ड ठेवणारी संस्था आहे. या दोन्ही संस्था एकत्रित काम करतात. येत्या काळात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र जारी करताना त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली जाईल आणि त्यांच्या परवानगीनंतर आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येईल.

हे देखिल वाचा-

आधार निष्क्रिय करण्यासाठी अशी असू शकते प्रक्रिया How to close aadhar card after death)

१. मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आधार नंबर बंद करण्यासंबधी दस्तावेज पाठवले जातील.

२. मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्यानंतर कुटुंबियांना ते घेण्यापूर्वी मृत व्यक्तीचा आधार नंबर सांगावा लागेल किंवा आधार कार्ड दाखवावं लागेल.

३. कुटुंबियांची परवानगी मिळाल्यानंतर मृत व्यक्तीचा आधार नंबर बंद करण्यात येईल.

४. या नियमांसंबधी सध्या राज्य सरकारसोबतही चर्चा सुरू आहे.

आधार संबधी सध्या सरकारच्या योजना

UIDAI या संस्थेने सध्या बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्म प्रमाणपत्र जारी करतानाच आधार नंबर अलॉट करण्याची योजना सुरू केली आहे. सध्या २० राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.

यात ५ वर्षांच्या आतील मुलांच बायोमेट्रिक्स घेतलं जातं नाही. केवळ आई वडिलांच्य़ा आधारच्या माहितीवर हे आधार जारी केलं जातं. त्यामुळे अपत्याच्या जन्मानंतर आता जन्म दाखला काढल्यानंतर पुन्हा आधारसाठी रांगेत उभं राहण्याची वेळ वाचणार आहे.

जन्म दाखला आणि आधार एकत्रित मिळणार आहे. मुलं ५ आणि १५ वर्षांचं झाल्यानंतर बायोमेट्रिक्स घेतले जातील. लवकरच ही योजना सर्वच राज्यांमध्ये सुरू होणार आहे. या सुविधा आधार 2.0 चा भाग आहेत. येत्या काळात सरकार आधारची विश्वासार्हता वाढवण्यासोबतच काही नवे फिचर्स आणण्याच्याही तयारीत आहे.

हे देखिल वाचा-

सर्व रेकॉर्ड होणार अपडेट

UIDAI या संस्थेने अपडेशनसाठी काही महत्वाची पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. यात ज्यांना १० वर्षांपूर्वी आधार कार्य जारी करण्यात आली आहेत त्यांना आधारवरील सर्व माहिती अपडेट करण्यास सांगितलं जातं आहे.

आधारवरील माहितीमध्ये काही बदल करण्यासोबतच ही माहिती वेळोवेळी ऑटो अपडेट कशी होईल यावरही काम सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यात ज्या व्यक्ती महत्वाच्या कागदपत्रांसाठी डीजी लॉकरवरचा वापर करतात त्यांचा समावेश होवू शकतो.

पॅन आणि आधार करा लिंक

अद्यापही ज्यांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही त्यांनी लवकरात लवकर ते करणं गरजेचं आहे. महत्वीच बाब म्हणजे शासनाने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२३ पर्यंत ही तारिख होती.

या तारखेपर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड बदं करण्याची सूचना जारी करण्यात आली होती. मात्र आता शासनाने अवधी वाढवून दिला आहे. पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी आता ३० जून २०२३ ही अंतिम तारिख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT