Bus Conductor esakal
Trending News

Bus Conductor:  सुपरमॅन कंडक्टर! एका हातात तिकीटाचे मशीन अन् दुसऱ्या हाताने वाचवला प्रवाशाचा जीव

सकाळ डिजिटल टीम

Bus Conductor :

तुम्ही बसमध्ये प्रवास केला असेल तर कंडक्टर किती किरकीर करतो, चिडचिड करतो हे तुम्ही पाहिले असेल. दिवसभर गर्दीत उभं राहून लोकांकडे तिकीट-तिकीट करणं, हे किती थकवणारं काम आहे हे कंडक्टरकडे पाहून तुमच्या लक्षात आले असेल. पण हाच कंडक्टर कधीकधी देवदूत बनतो.

काही बसचा अपघात झाल्यावर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढणारा, बस बिघडली तर दुसऱ्या बसची सोय करणारा कंडक्टर असतो. हाच कंडक्टर एका व्यक्तीसाठी देवदूत बनला आहे. एका व्यक्तीचा जीव जाता-जाता वाचला तोही कंडक्टरच्या कर्तव्यदक्षतेमुळे,कसे ते पाहूयात. 

एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बसमध्ये कंडक्टरच्या बाजूला बसच्या दारातच दोन व्यक्ती उभे आहेत. कंडक्टर त्यांचे तिकीट काढत आहे. तेवढ्यात बसला मोठा खड्डा लागतो आणि बस उडते.तेव्हा दारात उभा असलेला व्यक्ती दाराच्या दिशेने ढकलला जातो.

तो व्यक्ती दारातून बाहेर पडणार तेवढ्यात एका हातात तिकीट मशिन पकडलेला कंडक्टरने दुसऱ्या हाताने त्या व्यकीचा हात पडकला. आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवले. काही झालेच नाही या अविर्भावात कंडक्टर त्या व्यक्तीला हाताला पकडून पुढे घेतो आणि पुन्हा तिकीट काढू लागतो. कंडक्टरने केलेल्या या कामगिरीमुळे त्याचे कौतुक होत आहे.

हा व्हिडिओ केरळमधील बसमधील आहे. तिथल्या बसेसमध्ये CCTV असल्याने हा प्रकार रेकॉर्ड झाला. लोक आता केरळमधील बसेसमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्याचेही कौतुक करत आहेत. तर काही लोकांना अशी सुविधा भारतातील प्रत्येक बसमध्ये असावी अशीही मागणी केली आहे.

व्हायरल होणाऱ्य व्हिडिओवर लोकांनी चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. कंडक्टर देवदूत आहे, कोणत्याही रूपात देव तुम्हाला वाचवतो असे नेटीझन्सने कंमेंटमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT