Fastest to identify 100 car logos by a preschooler: गुजरातमधील अहमदाबाद या शहरातील ३ वर्षाच्या स्वयं भुवा या नावाच्या चिमुकल्याने २ मिनिटांमध्ये १०० कारचे लोगो ओळखुन कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
5 जुलै 2024 रोजी अहमदाबाद येथे भारतातून स्वयम विशाल भुवा या चिमिकल्याने अनोखा विक्रम केला. "प्रीस्कूलरद्वारे सर्वात जलद 100 कार लोगोस ओळखण्याचा" हा जागतिक विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्याचे वय 3 वर्षे 10 महिने 3 दिवस इतके आहे. इतक्या कमी वयात स्वयं विशाल भुवा या चिमुकल्याने फक्त 2 मिनिटे 5 सेकंदात 100 कार लोगो ओळखून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
स्वयं भुवा याचा जन्म 2 सप्टेंबर 2020 रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला. हा चिमुकला युरो किड्स स्कूल (गोटा शाखा) मधील प्ले ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहे. लॅपटॉपवर कार लोगोचे फोटो पाहून त्याने ही सर्व अचुक नावे सांगण्याचा विक्रम केला.
मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासूनच स्वयंची स्मरणशक्ती खुप चांगली आहे. प्रवासा दरम्यान तो कारचे लोगोपाहून अचुक नाव सांगत असे. कारचे विविध लोगो आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तो दररोज पुस्तके, मासिके आणि वेबसाईट्स पाहत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.