Managers Fired to Make Employees Happy eSakal
Trending News

Managers Fired : कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कंपनीने मॅनेजर्सची केली हकालपट्टी! परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा

या कंपनीने सर्व मॅनेजर्सना नारळ दिला, आणि त्यांच्या जागी प्रशिक्षकांची नेमणूक केली.

Sudesh

कंपनीमध्ये बॉस हा व्यक्ती असा असतो, जो बहुतांश लोकांना आवडत नाही. अगदी प्रमोशनसाठी बॉसच्या मागे मागे करणारी व्यक्तीही बऱ्याच वेळा मनातून त्याचा तिरस्कार करत असते. त्यामुळेच बॉसची ज्या दिवशी सुट्टी असते, त्या दिवशी कर्मचारी अगदी निवांत असतात. मात्र, अशा बॉसची जर कायमची सुट्टी झाली तर?

अमेरिकेतील एका व्हर्चुअल असिस्टंट कंपनीने घेतलेल्या एका निर्णयाने तिथले कर्मचारी अगदीच खुश झाले. या कंपनीने सर्व मॅनेजर्सची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यानंतर कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगलाच सुधारला असल्याचंही समोर आलं आहे.

मॅनेजरच्या जागी आणले कोच

टाईम ईटीसी (Time Etc.) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीने आपल्या नवीन कर्मचाऱ्यांना असं विचारलं, की तुम्हाला तुमच्या मॅनेजरकडून काय हवं आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी गोल-सेटिंग, फीडबॅक, पर्सनल आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या संधी, आणि स्वातंत्र्य अशा गोष्टी सांगितल्या. यावेळी कंपनीच्या लक्षात आलं, की या लोकांना मॅनेजर नाही तर प्रशिक्षकाची गरज आहे.

यामुळे मग कंपनीने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी सर्व मॅनेजर्सना नारळ दिला (Company fired Managers), आणि त्यांच्या जागी प्रशिक्षकांची नेमणूक केली. या सर्व प्रशिक्षकांकडे सहा-सहा जणांची टीम दिली गेली.

कर्मचाऱ्यांना सपोर्ट

या प्रशिक्षकांना एकच काम दिलं गेलंय. ते म्हणजे, कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं. वरून ऑर्डर देण्याऐवजी हे प्रशिक्षक कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून त्यांना येणारे अडथळे दूर करणे, त्यांना नियमित फीडबॅक देणे, त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे अशा गोष्टी या प्रशिक्षक करतात.

कशामुळे घेतला निर्णय?

Gallup नावाच्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं होतं, की २०२२ या वर्षात कर्मचाऱ्यांची कंपनीप्रति असणारी प्रतिबद्धता ही गेल्या सात वर्षांमधील सर्वात नीचांकी पातळीवर होती. कर्मचाऱ्यांना आपल्या कामात गुंतून राहणंच शक्य होत नाही ही चिंतेची बाब आहे. केवळ एक तृतीयांश कर्मचाऱ्यांनी आपल्याला कामात रस असल्याचे म्हटले.

ही चिंताजनक आकडेवारी पाहून टाईम ईटीसी कंपनीने याबाबत काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना काय हवंय हे जाणून घेतलं. मॅनेजर्सच्या हकालपट्टीनंतर इथले कर्मचारी अधिक खुश आहेत, आणि त्यांचा परफॉर्मन्स २० टक्क्यांनी सुधारल्याचं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT