Train in China Sakal
Trending News

Trending News: १९ मजली इमारतीच्या अगदी मध्यातून जाणारी ही ट्रेन; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल!

ही ट्रेन कुठे आहे, कशी चालते, काय आहे याचा इतिहास, जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

ऑफिसला जाताना लोकलने जाणारे अनेक जण असतील. आता मेट्रोचं जाळंही विस्तारत आहे. त्यामुळे मेट्रोनेही बरेच जण कामाला, शाळा कॉलेजला किंवा बाहेर फिरायला जात असतील. पण चीनमधले लोक अशा साध्या साध्या गोष्टी सुद्धा किती अनोख्या पद्धतीने करतात, याचंच एक उदाहरण आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे.

दक्षिणपूर्व चीनमधल्या चोंगकिंग इथले लोक ज्या ट्रेनने जातात ती ट्रेन एखाद्या पूलावरून वगैरे जात नाही तर ती चक्क एका इमारतीमधून जाते. ज्या इमारतीमधून ही ट्रेन जाते ती इमारत १९ मजली आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे ही इमारत रेल्वे स्टेशन नसून एक रहिवासी इमारत आहे. चोंगकिंग हे शहर अनेक उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. त्याला माऊंटन सिटी असंही म्हणतात.

हे शहर ३१,००० चौरस मैलांमध्ये विस्तारलं असून इथली लोकसंख्या ४९ दशलक्ष आहे. त्यामुळे शहराच्या रेल्वे अभियंत्यांना प्रत्येकाला सामावून घेण्याचा मार्ग तयार करण्यासाठी सर्जनशील असणे आवश्यक आहे. म्हणूनच अशा अनोख्या पद्धतीची रेल्वे या भागात सुरू करण्यात आली. आता ही रेल्वे काही आज आलेली नाही. २००४ मध्ये ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र आता या रेल्वेचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले आहेत.

कमी धूर आणि कमी आवाज आणि कंपन पातळीमुळे लाइट रेल चीनच्या सर्वात शांत रेल्वे मार्गांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. डिशवॉशर सारखे शांत राहण्यासाठी डिझाइन केलेल्या या ट्रेनचा आवाज मानवी श्रवणक्षमतेच्या तुलनेत अगदीच सुसह्य आहे. त्यामुळे

रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाची काळजी करण्याची गरज नाही कारण ट्रेनच्या प्रवासादरम्यान फक्त 60 डेसिबल आवाज निर्माण करते.

जेव्हा २००४ मध्ये ही ट्रेन सुरू करण्यात आली, तेव्हा महापालिकेचे परिवहन प्रवक्ते युआन चेंग म्हणाले की,'आपलं शहर खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलं आहे, ज्यामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गांसाठी जागा शोधणं हे खरं आव्हान बनू शकतं. काहीवेळा जमिनीवर जागा नसते, म्हणून आपल्याला खाली, किंवा वर, किंवा - या प्रकरणात - सरळ जाण्याचा विचार करावा लागतो. लोकांना यासारख्या वेगवान शहरात लवकर फिरायचं होतं. अशा प्रकारे रेल्वे रुळ वाढवणं हा एक जुगार होता, पण तो फसला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT