Travel blog peacock village esakal
Trending News

Travel Blog : चला मोरांच्या गावाला जाऊया; मोरांनी भरलेलं एक अनोखं गावं बघायलाच हवं!

मोरांचं अनोखं गाव तुम्ही बघितलंय का? तुम्हीही नक्की भेट द्यायला हवी

सकाळ डिजिटल टीम

Morachi Chincholi village: कामाचा कंटाळा घालवण्यासाठी लोक मोठ मोठी शहरं, समुद्रकिनारी जायचा प्लॅन करतात. पण, तुम्ही कधी छोट्या गावात जाण्याचा तिथे निसर्गाचा आनंद घेण्याचा विचार केलाय का? अनेकजण कंटाळा घालवण्यासाठी काही हटके ठिकाणं शोधत असतात. चला तर अशाच एका हटके स्थळाबद्दल जाणून घेऊया.

मोराची चिंचोली हे गाव आहे पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूरजवळ. अहमदनगर मार्गाला लागताच डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून आत गेल्यास हे गाव दिसतं. मोराची चिंचोली हे नावाप्रमाणेच गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. या गावात मोर आणि चिंचेची झाडे खूप आहेत. त्यामुळे या गावाला मोराची चिंचोली हे नाव पडले. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. अजूनसुद्धा या छोट्याशा गावात तुम्हाला खुप मोर पहायला मिळतील. (Travel)

येथील लहान मुलांना मोर जणू मित्र असल्याप्रमाणेच वाटतात. सकाळी उठल्या उठल्या दार उघडल्यावर व्हरांड्यात मोराचे दर्शन होते. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो.

येथे तुम्ही शेतकर्‍यांबरोबर शेतात काम करणे, रहाटाने विहिरीतून पाणी काढणे या ग्रामीण जीवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. येथे येऊन हुर्डा पार्टीचा आनंदही घेऊ शकता. गावाकडील चुलीवरची भाकरी, पिठलं, खरडा अशा उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

कधी दिसतील मोर

मोराचे थवे पाहण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ योग्य आहे. पावसाळा व हिवाळा हा मोरांचा आवडता काळ आहे. सकाळी ६.०० ते सकाळी ८.०० व संध्याकाळी ५ ते ७ ही मोर पाह्ण्यासाठीची उत्तम वेळ आहे. मोरांसह इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते . किकीर्डे , खंड्या, बया पक्षी , खार , भारद्वाज, कबुतरं सहज दिसतात.

मोरांसोबत हुर्डा पार्टी

हिवाळ्यात सर्वत्र शेतीच्या बांधावर हुरडा पार्टी केली जाते. या गावातही तुम्ही हुर्डा पार्टीचा आनंद लुटू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT