Trending :  esakal
Trending News

Trending : ‘तुझ्या माहेरातनं अंथरूण आणलं नाहीयेस, मग माझ्या मुलासोबत....’ अजब सासूचा गजब फतवा!

सकाळ डिजिटल टीम

Trending :

लग्नात घेतल्या जाणाऱ्या हुंड्याचे अनेक किस्से आहेत, हुंडा देणे गुन्हा असलं तरी तुम्ही तुमच्या लेकीलाच देताय या नावाखाली हुंडा मागितला जातो. आजवर आपण हुंडा आणला नाही म्हणून सुनेचा छळ होण्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. सुनेला मारहाण केली जाते, तिला माहेरी पाठवलं जातं.

पण, उत्तर प्रदेशात एक वेगळीच घटना घडली आहे. सुनेने लग्नात अथरूण आणलं नाही म्हणून तिला नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातल्या या तरूणीने या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर कुटुंब तक्रार निवारण केंद्रात वर-वधू पक्षाची बैठक बसवली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मसौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरूणीचे आहे.  २५ फेब्रुवारी २०२४ रोजी लखनऊ येथील सरकारी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा विवाह झाला होता.

तरूणीच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या आई आणि भावांनी लग्नावेळी हुंड्यात इतर गोष्टींसह चारचाकी गाडीही दिली होती. लग्न करून घरात आल्यावर रात्री दहापर्यंत मी एकटीच दुसऱ्या मजल्यावर एका ठिकाणी बसले होते. कोणी चहा-पाणी सुद्धा विचारले नाही. म्हणून तिने सासूकडे जाऊन माझी रूम कुठे आहे हे विचारले,

पुढे ती म्हणते की, सासूने रूम दाखवली पण खोलीत अंथरूण नव्हते. हे लग्न फेब्रुवारीत झाल्याने तेव्हा कडाक्याची थंडी होती. मी तशीच कशी झोपू मला पांघरायला काहीतरी द्या असे मी सासूला म्हणाले तर त्यांनी ‘अंथरून पांघरून तर तुझ्या आईने दिलेच नाही’,असे मग आम्ही कुठून देऊ, त्यामुळे तशीच झोप, असे त्यांनी सांगितले.

मी रूममध्ये गेले आणि बेडच्या एका कोपऱ्यात बसून राहीले. माझ्या सासूबाईंनी माझ्या पतीलाही रूममध्ये पाठवले नाही. मध्यरात्री पती चादर घेऊन आले आणि मला झोप म्हणाले. लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीही आम्हाला मधुचंद्र साजरा करता आला नाही. कारण, नवरा कधी रूममध्ये आलाच नाही. तो चौथ्या दिवशी शेजारी असलेल्या भावाच्या घरात गेला तो चार दिवसांनी परतला, असेही या तरूणीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तेव्हा सासूबाईंनी तिला विचारले की, तुम्ही मधुचंद्र अजून साजरा केला नाही का? त्यावर मी म्हणाले की, तुमच्या मुलाला विचारा सत्य काय आहे.

तेव्हा सासूबाईंनी सुनेला ऐकवले की, माझा मुलगा माझ्या शब्दापुढे नाही, तो माझ्या संमती शिवाय तूला स्पर्शही करणार नाही. तसेच, तुझ्या आईने आम्हाला टीव्ही दिला असता तर आम्ही सासू आणि सून दोघींनी बसून तो पाहिला असता.

तर महागातल्या साड्याही तुम्ही दिल्या नाहीत. यामुळे आमचा खूप अपमान झाला आहे. या सर्व गोष्टींचा आम्हा सर्वांना खूप राग आहे, त्यामुळेच आम्ही तुला तुझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत.

पुढे ती तरूणी म्हणते की, मी 15 दिवसांनी माझ्या भावासोबत माहेरी गेले. तेव्हा नवरात्रीसाठी घेऊन जाण्यासाठी माझ्या पतीला फोन केला, पण ते आले नाहीत. नंतर त्यांनी तू येऊ नको तिकडेच रहा असा निरोप दिला. मी समजावले पण ते ऐकायलाच तयार नव्हते.

त्यांनी मला असे सांगितले की, टिळ्याचा कार्यक्रम होता तेव्हा तुझ्या माहेरकडच्या लोकांनी खाण्या-पिण्याची व्यवस्था नीट केली नव्हती, त्यामुळे तू येऊ नको, असे पतीने या तरूणीला सांगितले.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT