Trending esakal
Trending News

Trending : घरकामाला बाई हवी म्हणून पतीचे लावले दुसरे लग्न; बॅंक मॅनेजर असलेल्या पत्नीचा पराक्रम!

'घरात कामाचा ढिग पडलेला असायचा. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं आहे'

सकाळ डिजिटल टीम

Trending :

तुम्ही श्रीदेवी-उर्मिला मातोंडकर यांचा जुदाई चित्रपट पाहिला असेल. तर त्यामध्ये पैशांसाठी पतीचे दुसरे लग्न लावले असते. हे चित्रपटातच चांगले वाटते. पण, खरंच एका महिलेने असे धाडस केले आहे.     

आजकालच्या काळात काय होईल याचा काहीच अंदाज लावता येत नाही. घरात कामवाली हवी म्हणून महिला हवे तितके पैसे मोजायला तयार असतात. केवळ पैसेच नाहीतर कामवाल्या मावश्यांच्या सर्व अटीही त्या पूर्ण करतात. पण, घरात कामाला बाई हवी म्हणून एका महिलेने चक्क नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं आहे.  

होय हे खरं आहे,बिहारच्या जगदीशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सेनो गावातील रहिवासी संजय रविदास यांची मुलगी काजल हिचा विवाह 2 मे रोजी खरगपूर, मुंगेर येथील रहिवासी हिरालाल दास याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. 4 मे रोजी काजल आणि हिरालाल दिल्लीत आले.

दिल्लीतील घरात एक-दोन दिवस सर्व काही व्यवस्थित चालले. त्यानंतर हिरालाल दास यांनी त्यांची पहिली पत्नी संगीता देवी यांच्यासोबत एकाच घरात राहण्यास आणि पत्नीसारखेच वेळ घालवण्यास सुरूवात केली.

दुसरी पत्नी काजलने त्याला विचारले असता हिरालालने सांगितले की, घरात असणारी दुसरी महिला त्याची पहिली पत्नी आहे. आणि आता ती तुझी सवत आहे. घरात कामाचा ढिग पडलेला असायचा. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं आहे, असे हिरालालने काजलला सांगितले.

यावर तो असेही म्हणाला की, हे सत्य ऐकल्यानंतर तूला इथे राहायचे असेल तर राहा, नाहीतर निघून जा. यानंतर काजलने भांडण केले तेव्हा या नवरा बायकोनी तिला मारहाण केली. तिला कोंडून ठेवण्याचा प्रकारही झाला. पण ती तिथून पळून पुन्हा गावी आली.

काजलने दिल्लीहून भागलपूर गाठले आणि येथील पोलिस ठाण्यात या प्रकाराबद्दल पती आणि त्याची पहिली पत्नी यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करून आरोपी पतीवर कारवाई करण्याची मागणी केली.

काजलने सांगितले की, लग्नानंतर तो मला दिल्लीला घेऊन गेला. जिथे त्यांची पहिली पत्नी होती जी एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होती. तिला कामासाठी वेळ नसायचा त्यामुळे तिने पतीला दुसरे लग्न कर असे सांगितले.

दिल्लीला गेल्यानंतर आम्हाला आयती कामवाली हवी होती म्हणून तुझ्यासारख्या गरीब मुलीला आम्ही घरी लग्न करून आणलं आहे. जर तू आमचं ऐकलं नाहीस तर आम्ही तुला मारून टाकू असे म्हणून त्यांनी मला धमकी दिली, असेही काजलने सांगितले. सध्या याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोल जाहीर होताच मंगलप्रभात लोढा यांनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT