Trending esakal
Trending News

Trending : धक्कादायक, सातवीतल्या विद्यार्थ्याने शिक्षकाचीच केली धुलाई, गुरू पौर्णिमेदिवशीच घटना आली समोर

सकाळ डिजिटल टीम

Trending :

आज गुरुपौर्णिमा आहे. आजच्या दिवशी गुरुला वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. पूर्वीच्या काळी गुरुकुल होते तेव्हा ऋषीमुनी मुलांना वेदविद्या शिकवायचे. सध्या आपल्याकडे शाळेतील गुरुजी असतात जे आपल्याला आयुष्याच्या भेट देतात.

शाळेतील शिक्षकांची आपण आयुष्यभर आठवण ठेवतो. त्यांनी दिलेला मार त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आपल्या नेहमीच लक्षात असते. आजचाच दिवशी असे घटना समोर आली आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

ज्या दिवशी गुरुला वंदन करायचं त्या दिवसाच्या दोन दिवस आधी एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला मारहाण केली. आणि तो शिक्षक सध्या आयसीयूमध्ये भरती आहे. काय आहे हे प्रकरण हे पाहुयात.

उत्तर प्रदेश मधील श्रावस्ती येथील सातवीच्या विद्यार्थ्यांनी हा पराक्रम केला आहे. त्याने शाळा सुटल्यानंतर शिक्षकांचा पाठलाग केला आणि शिक्षक आणि तो एका नदीवर नदीच्या पुलावर आल्यानंतर त्याने शिक्षकाला आडवा पाडून काठीने मारहाण केली.

उत्तर प्रदेश मधील ककंदो गावात गावातील शिक्षक सुनील कुमार गुप्ता हे मोहरनीय गावातील मनोहर लाल जवाहरलाल इंटर कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. ते सातवीच्या आणि इतर विद्यार्थ्यांना शिकवतात. ही घटना घडली त्या दिवशी सातवी मध्ये शिकणाऱ्या फरमान आली या विद्यार्थ्यांनी काहीतरी चूक केली आणि सुनील कुमार यांनी फरमानला दोन कानशिलात लगावल्या. त्यामुळे संपूर्ण वर्ग या मुलावरती हसू लागला. यामुळेच शिक्षकांना धडा शिकवायचा ठरवले या विद्यार्थ्याने ठरवले.

शाळा सुटल्यानंतर नदीच्या दिकोली पुलावर या मुलाने सुनील कुमार यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी शिक्षक सुनील कुमार गाडी चालवत होते ते गाडीवरून पडले आणि पडल्यानंतर सुद्धा फरमान अली याने शिक्षकांना बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्याने शिक्षकांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. शिक्षक बेशुद्ध पडले त्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि तिथून हा मुलगा पळून गेला. लोकांनी या शिक्षकाला दवाखान्यात भरती केले त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत

सोनवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेतील हा प्रकार आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच त्याच दिवशी त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला वर्गात मारलं होतं त्याचाच राग धरून या विद्यार्थ्याने हे कृत्य केले आहे.

या प्रकारानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. पोलिसांना त्याने सांगितले की, सरांनी मला सर्व वर्गात दोन कानशिलात लगावल्या होत्या. त्यामुळे मला राग आला होता आणि म्हणून हे कृत्य केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT