Tupperware  ाेोकोत
Trending News

Tupperware : प्रत्येक घरात किचनमधे दिसणारे टपरवेअरचे डबे पुढे दिसतील की नाही? कारण...

बहुतांश घरात तुम्ही फ्रिज उघडून बघितला तर तुम्हाला टपरवेअरचे डजनभर डबे सापडतील. मात्र लवकरच ते आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत

सकाळ डिजिटल टीम

Tupperware : प्रत्येक घरात किचनमधे तुम्हाला टपरवेअरचा एखादासुद्धा डबा दिसणार नाही असं शक्यच नाही. बहुतांश घरात तुम्ही फ्रिज उघडून बघितला तर तुम्हाला टपरवेअरचे डजनभर डबे सापडतील. मात्र लवकरच ते आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. आणि हा दावा तज्ज्ञांकडूनच करण्यात आलाय. तेव्हा यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊया.

घराघरात टपरवेअरचे जे डबे तुम्हाला दिसून येतात ती टपरवेअर बनवणारी कंपनी ७७ वर्षे जुनी आहे. मात्र यापुढे ही कंपनी या प्रोडक्टचं उत्पादन करेल की नाही यावर आता प्रश्नचिन्हच निर्माण झालंय. वाढतं कर्ज, घसरलेला खप यामुळे कंपनीसमोर त्यांची गुंतवणुक नष्ट होण्याचा धोका निर्माण झालाय.

मागल्या काही वर्षात कंपनीने त्यांच्या उत्पादनांना नवं रुप देत तरुण ग्राहकांमधे त्यांची खास ओळख निर्माण करण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांच्या खपात सातत्याने घटच दिसून आली.

1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये टपरवेअर प्रोडक्टने देशात नवी क्रांतीच घडवून आणली होती. टपरवेअरचे हवाबंद डबे तसेच द्रवपदार्थ बाहेर न पडू देणाऱ्या त्यांच्या उत्पादनांनी बाजारात वेगानं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.

कंपनीने त्यांचा खप घटवण्यासाठी नवनव्या स्ट्रॅटेजीसुद्धा वापरल्यात. मात्र त्याने कंपनीच्या प्रॉफिटमधे काहीला बदल झाला नाही. युनायटेड किंग्डममध्ये तर टपरवेअरची विक्री 2003 पासूनच बंद झाली आहे. कंंपनीच्या वरिष्ठांचं मत विचारात घेतलं तर त्यांना पुढे कंपनीमधे गुंतवणुक होण्याची शक्यता फारशी दिसत नाहीये. (Kitchen)

रिटेल अॅनालिसिस फर्म सॅव्ही मार्केटिंगच्या संस्थापक कॅथरीन शटलवर्थ म्हणतात, की जेव्हा ही उत्पादनं बाजारात नवीन होती तेव्हा लोकांचा या उत्पादनाकडे विशेष कल होता मात्र आता त्यापेक्षा स्वस्त दराच्या उत्पादनांनी बाजार भरलेलं असल्याने आता टपरवेअरचा खप कमी झालाय. शिवाय बाजार एकापेक्षा एक नवीन उत्पादनं उदयास आली आहे. (Plastic Material)

कोव्हिडच्या काळात या कंपनीची विक्री वाढल्याने कंपनीची स्थिती पूर्वीप्रमाणे सुधारेल अशी आशा कंपनीला होती. मात्र कोविड काळापूर्तीच कंपनीचा खप वाढला असून आता मात्र कंपनीच्या विक्रीबाबतची स्थिती जशीची तशी दिसून येते. तसेच कंपनीचे शेअर्ससुद्धा घटले आहेत. अशा वेळी पुढील काळात या कंपनीमधे कोणी गुंतवणुक करेल याची शक्यता दिसत नाहीये. मोठ्या निधीच्या अभावी कंपनीचा कधीही बंद पडण्याच्या मार्गावर येऊ शकते.

कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असण्यामाहे हेही एक कारण

कंपनीने गेल्या काही वर्षात त्यांच्या प्रोडक्टमधे लोकांना अपेक्षित असे कोणतेही बदल केले नाही. त्यामुळे ग्राहकांचा कल बाजारात येणाऱ्या नव्या प्रोडक्टकडे जास्त होता. आजही कंपनी मार्केटमधे टिकून राहाण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाही. तसेच या टपरवेअर बनवणाऱ्या या कंपनीच्या तुलनेत इतर कंपन्यांचे प्रोडक्ट स्वस्त दराने मिळत असल्याने त्यांचा खप वाढत चाललाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT