two men shot dead inside salon delhi cctv footage goes viral marathi news  
Trending News

सलूममध्ये डबल मर्डराचा थरार! डोक्यावर बंदूक ठेवून मारली गोळी; घटनेचं CCTV फुटेज होतंय व्हायरल

Delhi Double Murder CCTV Video Goes Viral : दिल्लीच्या नजफगड परिसरात भरदिवसा डबल मर्डरचा थरार समोर आला आहे.

रोहित कणसे

Delhi Double Murder CCTV Video Goes Viral : दिल्लीच्या नजफगड परिसरात भरदिवसा डबल मर्डरचा थरार समोर आला आहे. येथील एका सलूनमध्ये शुक्रवारी काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान सलूनमध्ये झालेल्या या फायरिंगचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेल्याचे पाहायला मिळालं, दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अवघ्या १४ सेकंदाच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन लोक सलूनमध्ये घुसल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सलूनमधील एका सीटच्या बाजूला खाली जमीनीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान पिवळ्या रंगाची हूडी घातलेला अएक हल्लेखोर सलूनमध्ये घुसतो.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की पिवळ्या रंगाची हुडी घातलेला व्यक्ती खाली बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवतो आणि त्याला गोळी चालवतो. गोली मारण्याच्या आधी तो व्यक्ती हात जोडत असताना दिसत आहे. यादरम्यान एक महिला देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. हल्लेखोर लागोपाठ गोळ्या झाडताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नजफगड पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी मृतांची ओळख पटवली असून सोनू आणि आशीष अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे वय ३० च्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. दोघांना सलूनमधील कस्टमर आणि स्टाफच्या समोरच एकापेक्षा जास्त गोळ्या मारण्यात आल्या.

दरम्यान पोलीसांनाव्यक्तीगत वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. तसेच पोलीसांनी गँगवारची देखील शक्यता नाकारली नाहीये. आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली पोलीसांनी तीन टीम बनवल्या असून आरोपींचा शोध आणि अटकेसाठी दिल्ली पोलीसांचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT