इंटरनेटच्या जमान्यात दररोज काहीतरी व्हायरल होतं असतं. अशा व्हायरल होणाऱ्या फोटो व्हिडीओवर अनेक वापरकर्ते कमेंट्स लाईक्सचा पाऊस पाडताना दिसतात. गणेशोत्सव काळातील असाच एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई जुन्या लवणीवर नृत्य करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये श्री गणेश पार्क मित्र मंडळ ससाणे नगर, हडपसर या मंडळाचा गणपती दिसतो आहे. तर या गणपतीसमोर एक वयाची सत्तरी ओलांडलेल्या आजी 'बुगडी माझी सांडली गं...' या अजरामर गाण्यावर गाण्यावर लावणी नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या भोवती काही तरूण मंडळी त्यांचा डान्स पाहाताना दिसत आहेत.
पारंपारिक पद्धतीची साडी नेसलेल्या या आजी नृत्य करताना मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. नाचताना आजींनी डोक्यावर पदर घेतला आहे. तसेच त्यांच्या कपाळावर कुंकू देखील दिसत आहे. आपल्याच धुंदीत नृत्य करणाऱ्या या आजींनी नेटकऱ्यांची मन मा६े जिंकली आहेत. एकप्रकारे त्यांनी कला जोपासण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. तुम्ही तरुण असा किंवा वयोवृद्ध तुम्ही तुमची कला जोपसता येते हेच त्यांनी दाखवून दिले आहे.
नेटकऱ्यांनी काय म्हटलं?
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून कमेंट्स केल्या जात आहेत. ६४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच कमेंटबॉक्समध्ये लोक आजींच्या नृत्यकलेचं तोंडभरून कौतूक करत आहेत.
एका यूजरने लिहीलंय की, "देवबाप्पा समोर आनंद कधीच कुणाचा लपून राहिला नाही आजीने आज सिद्ध केला की आनंदाला वय नसतं"
तर दुसऱ्या एका यूजरने "१ लाख गौतमी पाटलीणी खाऊन टाकल्या आज्जींनी! खुप छान पदर सांभाळून केलेली लावणी!" अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने जयश्रीबाईंनी अजरामर केलेली बुगडी आज आज्जींनी संस्कृतीचे दर्शन घडवत नव्या पिढीच्याही मनात कायमची रुजवली....धन्यवाद आज्जी. ही बुगडी येणाऱ्या प्रत्येक पिढीला भुलवत राहिल यात तिळमात्र शंका नाही, असं म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.