भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.
Rishi Sunak New UK PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागलीय. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट (Penny Mordaunt) यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला.
ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. अवघ्या 42 व्या वर्षी सुनक यांच्या हाती ब्रिटनचा कारभार आला आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. लिझ ट्रस (Liz Truss) यांनी अवघ्या 45 दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचं राजकारण ढवळून निघालं. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson), पेनी मॉर्डंट आणि ऋषी सुनक हे तिघं रिंगणात होते. मात्र, सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या बहुतांशी खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिला. त्यामुळं जॉन्सन यांनी सुरुवातीला माघार घेतली.
त्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 पर्यंत पेनी मॉर्डंट यांनीही माघार घेतली. त्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील, अशी घोषणा कंझरव्हेटिव्ह पक्षानं केली. ब्रिटिशांनी तब्बल 150 वर्षे भारतावर राज्य केलं. त्याच ब्रिटिशांवर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीचं राज्य आलं आहे. ऋषी सुनक यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळं भारतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऋषी सुनक यांचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऋषी सुनक हे लंडन इथं गोमातेची पूजा करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुनक यांची गायीवर (Cow) किती श्रध्दा आहे, हे दिसून येतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.