Tamil Nadu Football 
Trending News

Viral Video: मॅच हारल्यानं फुटबॉल प्रशिक्षकाची विद्यार्थांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल संताप

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : शाळेच्या फुटबॉल टीमनं खेळांच्या स्पर्धेत खराब कामगिरी केल्यानं कोचनं टीममधील खेळाडू विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. तामिळनाडूच्या एका शाळेतील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील मेत्तूर जवळच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. अन्नामलाई नामक खेळाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, शिक्षक अन्नमलाई हे शाळेच्या फुटबॉल टीमचे कोच आहेत. त्यांच्या शाळेच्या फुटबॉल टीमनं एका स्पर्धेत भाग घेतला होता. पण या टीमनं कोचच्या समाधानकारक काम केलं नाही. यावरुन सर्व विद्यार्थ्यांना जमिनीवर बसवून एक एक करुन विद्यार्थ्यांना वाईटरित्या मारहाण केली.

काही विद्यार्थ्यांना या शिक्षकानं कानशिलात लगावल्या तर काहींना लाथा घातल्या आणि काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे केस त्यानं ओढले. तर एका विद्यार्थ्यांला त्यानं सातत्यानं लाथांनी बेदम मरहाण केली. या कठोर शिक्षेचा व्हिडिओ तिथं उपस्थित असलेल्या कोणीतरी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर तो ट्विटरवर व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तो पाहिला आणि खूपच संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये असंही दिसतंय की, कोच आपल्या टीमच्या खेळाडूंना प्रश्न विचारतोय की तुम्ही पुरुष आहात की महिला? तुम्ही समोरच्या टीमला गोल कसे करु दिलेत? तू बॉल पुढे जाऊच कसा दिलास? अशा पद्धतीची भाषा वापरल्याचा आणि बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संगागिरी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली. त्यानंतर याचा सविस्तर अहवाल क्रिडा विभाग तसंच जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून दिला. तसंच क्रिडा शिक्षक अन्नामलाई यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

नेटकरी काय म्हणताहेत?

एकानं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे गंभीर असून आपल्या खेळाडूंना वागवण्याची ही योग्य पद्धत नाही. हा कोण माणूस आहे? त्याच्यावर तात्काळ बंदी घालायला हवी. दुसऱ्या एकानं म्हटलं की, अशा प्रशिक्षकांमुळं आपण फुटबॉलच्या क्षेत्रात कुठेच नसतो. खेळाडूंच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत केलं पाहिजे त्यांच्याकडून रिझल्टची अपेक्षा करता कामा नये. आपले प्रशिक्षक हे अजूनही १९५० मध्ये असल्यासारखे वागतात.

तसंच आणखी एका नेटकऱ्यानं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आपल्याकडं प्रशिक्षक खेळाडूंना मारहाण करतात पण खेळाडू कधीही याची तक्रारही न करता चांगली कामगिरी करतात. पण आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. तर आणखी एकानं या प्रशिक्षकाची बाजू घेत म्हटलं की, खूपच चांगलं ट्रेनिंग देत आहेत. कारण खेळाडू विद्यार्थ्यांना ही शिक्षा लक्षात राहिली पाहिजे की ते कशा प्रकारे आपला खेळ सुधारला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT