सासू-सुनेच्या भांडणात नवऱ्याचे हाल होतात. हे आजवर तुम्ही ऐकले पाहिले असेल. पण, आपल्या देशात अशी घटना घडलीय. ज्यात नवऱ्यासह पोलिसांचा जीवही रडकुंडीला आला. त्याचं झालंय असं की, पती-पत्नी आणि नवऱ्याची आई म्हणजे सासुबाई पाणीपुरी खायला गेल्या होत्या.
तिथे गाड्यावरील भैय्याने नवऱ्याच्या हातात प्लेट दिली. त्याने ती प्रथम आईला दिली. हिच गोष्ट पत्नीला आवडली नाही. तिने भर बाजारात नवऱ्यासोबत भाडंणं काढले. या भांडणात मुलीच्या माहेरचे आणि सासरची इतर मंडळीही सहभागी झाले. नक्की हा विषय काय आहे जाणून घेऊयात.
हे प्रकरण जगतपूर परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या पती-पत्नीने सोमवारी सायंकाळी पाणीपुरीच्या दुकानाबाहेर गोंधळ घातला. नवऱ्याने पत्नी आणि आईसाठी पाणीपुरी मागवली होती. पण पतीने पाणीपुरीची प्लेट आधी पत्नीला न देता आईला दिल्याने पत्नी संतापली. या बिचाऱ्या पतीचे नाव सुधांशू राय असून तो आणि पत्नी सपना कुमारी दुकानाबाहेर सर्वांसमोर भांडत होते.
वाद वाढत गेल्यावर पत्नीने आई-वडिलांना बोलावले. पतीने घरातील सदस्यांनाही बोलावले. दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा जोरदार हाणामारी झाली. एवढा गोंधळ झाला की पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिस येताच दोन्ही पक्षांनी पाणीपुरीविषयी बोलणे बंद केले आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले.
सुधांशूने त्याचा भाऊ हिमांशू आणि इतर कुटुंबीयांनाही बोलावून घेतले. दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण केली गेली. यावेळी दोन्ही बाजूचे काही जण जखमीही झाले. गोंधळ वाढल्यावर पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सपना म्हणाली की माझा नवरा, सासू आणि सासरे मला रोज माहेरातून एसी घेऊन ये असे म्हणतात.
मी नकार दिल्याने सासरच्या लोकांनी मला मारहाण केली. दरम्यान, सपनाला आईची सेवा करायची नाही, असे सुधांशूचे म्हणणे आहे. तिला मालमत्ता वाटून घ्यायची आहे. मला आणि माझ्या आईची ताटातूट करायची आहे असे सुधांशू म्हणाला.
सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पत्नी आईची सेवा करत नाही, असा आरोप पतीने केला आहे. पोलिसांनी मोठ्या मेहनतीने पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.